• Download App
    बकरी ईद साठी गो वंशाची कुर्बानी नको, त्या रोखा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या पोलीस महासंचालकांना सूचनाGoats should not be allowed to be sacrificed for Eid

    बकरी ईद साठी गो वंशाची कुर्बानी नको, त्या रोखा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या पोलीस महासंचालकांना सूचना

    वृत्तसंस्था

    मुंबई : उद्या 10 जुलैच्या बकरी ईद सणासाठी गो वंशाची कुर्बानी होऊ देता कामा नये. ती रोखली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती कारवाई करा, अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून दिल्या आहेत. Goats should not be allowed to be sacrificed for Eid

    विश्व हिंदू परिषदेने विधानसभा अध्यक्षांकडे या संदर्भात एक निवेदन दिले आहे. ते निवेदन देखील राहुल नार्वेकर यांनी आपल्या पत्राला जोडले आहे. उद्या 10 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशी आहे. त्याचबरोबर बकरी ईद सुद्धा आहे. ईदच्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी साठी गो वंशाची हत्या होण्याची दाट शक्यता आहे.

    मात्र, महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. त्याचे तंतोतंत पालन उद्या झाले पाहिजे. बकरी ईदच्या दिवशी गोवंशाची कुर्बानी होऊ देता कामा नये. यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात केल्या आहेत.

    Goats should not be allowed to be sacrificed for Eid

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील