वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई महापालिकेने जून महिन्यात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या मुद्यावर पालिकेच्या भूमिकेनं घोर निराशा केली, या शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. Get vaccinated at home in June : Mumbai High court
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यास जाणे शक्य नसल्याने त्यांना घरोघरी जाऊन लस द्यावी,
अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयातील वकील ध्रुती कापाडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केली आहे. त्यावर बुधवारी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी झाली.
घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास तयार आहे. मात्र केंद्र सरकारनं त्यासाठी नियमावली जारी करावी, अशी भूमिका गुरूवारी मुंबई पालिकेने मांडली होती.
तसेच लसीकरणासाठी लसींचा साठा नसल्याचे सांगितले. मात्र, ही भूमिका न्यायालयाला मान्य नाही.साठ्यानुसार लस देत आहात. मग , ती घरोघरी जाऊन द्यायला काय हरकत आहे?,
असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. दरम्यान यासंदर्भात ‘नेगवॅक’ ला 1 जूनपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश बुधवारी देत सुनावणी 2 जूनपर्यंत तहकूब केली आहे.
Get vaccinated at home in June : Mumbai High court
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाचे संक्रमण हवेतून होण्याचा धोका ; केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स
- Corona Deaths : कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक मृत्यूचा रेकॉर्ड भारताच्या नव्हे, तर अमेरिकेच्याच नावावर, वाचा सविस्तर..
- गावातील ११९ लोक पॉझिटिव्ह येऊनही केली कोरोनावर मात, नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने दाखविला संसगार्ची चेन ब्रेक करण्याचा मार्ग
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गडकरी महाराष्ट्राचे नेते, ते पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच!