• Download App
    सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा ठसका, गॅस सिलिंडर आजपासून पुन्हा महाग, असे चेक करा आपल्या शहरातील नवे दर । gas cylinder price hike from 6 october 2021 check delhi mumbai chennai and kolkata price here

    सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा ठसका, गॅस सिलिंडर आजपासून पुन्हा महाग, असे चेक करा आपल्या शहरातील नवे दर

    gas cylinder price hike : महागाईचा बोजा सामान्य जनतेवर वाढत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत गेल्यानंतर आज घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत. आतापासून तुम्हाला गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी 15 रुपये अधिक खर्च करावे लागतील. सरकारी तेल कंपन्यांनी विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढवले ​​आहेत. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. gas cylinder price hike from 6 october 2021 check delhi mumbai chennai and kolkata price here


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महागाईचा बोजा सामान्य जनतेवर वाढत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत गेल्यानंतर आज घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत. आतापासून तुम्हाला गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी 15 रुपये अधिक खर्च करावे लागतील. सरकारी तेल कंपन्यांनी विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढवले ​​आहेत. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या.

    सर्व महानगरांमध्ये दर वाढवले

    देशाची राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह सर्व महानगरांमध्ये एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत. आपल्या शहरात 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचा दर काय आहे ते पाहूया-

    विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 6 ऑक्टोबर 2021 रोजी
    दिल्ली – 899.5 रुपये
    कोलकाता – 926 रुपये
    मुंबई – 899.5 रुपये
    चेन्नई – 915.5 रुपये

    पाटण्यात 1000 रुपये

    बिहारची राजधानी पाटणामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 998 रुपयांवर पोहोचली आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्याचे मानले जाते. जर कच्च्या तेलाच्या किमती या वेगाने वाढत राहिल्या तर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत लवकरच 1000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.

    1 सप्टेंबरला एलपीजी सिलेंडर 25 रुपयांनी महागला

    1 सप्टेंबर रोजी 14.2 किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केली होती.

    1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक सिलिंडर महाग झाले

    1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले. दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1693 रुपयांवरून 1736.50 रुपये करण्यात आला. कोलकात्यात 1805.50 रुपये, मुंबईत 1685.00 रुपये आणि चेन्नईमध्ये 1867.50 रुपये होती.

    अशी चेक करा आपल्या शहरातील किंमत

    इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमच्या शहराचे दर तपासू शकता. तुम्हाला https://www.iocl.com/pages/indane-cooking-gas-overview या लिंकवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला अनुदानित आणि विनाअनुदानित दोन्ही सिलिंडरच्या किमती दिल्या जातील.

    gas cylinder price hike from 6 october 2021 check delhi mumbai chennai and kolkata price here

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य