• Download App
    'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन, प्रकृती गेल्या दोन-तीन दिवसांपासून होती बिघडलीArvind Trivedi, who played the role of Ravana in 'Ramayana', has passed away

    ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन, प्रकृती गेल्या दोन-तीन दिवसांपासून होती बिघडली

    वृत्तसंस्था

    मुंबई : दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी ( वय ८३) यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती गेल्या दोन- तीन दिवसांपासून बिघडली होती. मंगळवारी ( ता. ५ ) रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.Arvind Trivedi, who played the role of Ravana in ‘Ramayana’, has passed away

    अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. आपल्या अभिनयातून अरविंद त्रिवेदी यांनी रामायण मालिकेत रावणाची भूमिका पेलण्याचे शिवधनुष्य लीलया पेलेले. या वर्षी मे महिन्यात अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाल्याच्या अफवा सुद्धा पसरल्या होत्या.

    अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांचे बंधू उपेंद्र त्रिवेदी हे गुजराती चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अरविंद त्रिवेदी, ज्यांनी लोकप्रिय हिंदी मालिका रामायणमधून नाव कमावले, त्यांनी सुमारे ३०० हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.

    गुजराती भाषेतील धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे ४० वर्षे गुजराती प्रेक्षकांची मने जिंकली. गुजराती चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सात पुरस्कार मिळाले होते. २००२ मध्ये ते सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांनी २० जुलै २००२ ते १६ ऑक्टोबर २००३ पर्यंत सीबीएफसीचे प्रमुख म्हणून काम केले

    अभिनेता ते खासदार

    अरविंद त्रिवेदी हे १९९१ ते १९९६ पर्यंत खासदारही होते. १९९१ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. ते भाजपचे खासदार म्हणून साबरकाठा मतदारसंघातून निवडून आले होते.

    Arvind Trivedi, who played the role of Ravana in ‘Ramayana’, has passed away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!