• Download App
    राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक; नेमकं प्रकरण कायGang demanding ransom in the name of Raj Thackeray arrested; What exactly is the case?

    राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक; नेमकं प्रकरण काय?

    धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांमध्ये मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे.Gang demanding ransom in the name of Raj Thackeray arrested; What exactly is the case?


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावानं खंडणी मागणाऱ्या टोळीला, मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांमध्ये मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे.

    दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माते युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस बजावल्याचं सांगितलं जात आहे.आरोपींनी मड परिसरातल्या एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केला. सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी कलम 452,385,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.



    या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. मारत असताना ती त्याला राजसाहेबांना ओळखत नाही का? मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही का? काम कोणासाठी करत आहेस? असे प्रश्नही विचारताना दिसत आहे. व्हिडिओत आलेल्या उल्लेखावरुन या महिलेचं नाव दिपाली असल्याचं दिसून येत आहे.

    या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनुराग दिक्षीत यांनी माहिती दिली आहे. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातल्या महिलेला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं. मात्र ती रात्री आली नाही, म्हणून तिला आता पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.

    Gang demanding ransom in the name of Raj Thackeray arrested; What exactly is the case?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना