आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे.Further escalation of Tukaram Supe’s difficulties; Found ‘so many’ lakhs of cash
विशेष प्रतिनिधी
पुणे : टीईटी परिक्षेत पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. टीईटी गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुपे व सावरीकर यांच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशातच आता याप्रकरणी तुकाराम सुपेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.
तुकाराम सुपेंकडून आज आणखी 33 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.याआधी म्हणजे ज्यावेळी सुपे यांना अटक करण्यात आली त्यावेळी पेपरफुटीप्रकरणात पुणे पोलिसांना तुकाराम सुपेच्या घरात 2 कोटी रुपये आणि मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याची माहिती समोर आली होती.
आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे. तुकाराम सुपेंवर कारवाई करण्यात आल्यावर तपासात त्यांनी लपवलेले सगळे पैसे हळूहळू समोर येत आहे.दरम्यान, हे पैसे त्याच्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरी दडवून ठेवले होते.त्यामुळे आता सुपेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे.
Further escalation of Tukaram Supe’s difficulties; Found ‘so many’ lakhs of cash
महत्त्वाच्या बातम्या
- मनी मॅटर्स : कोणत्याही परिस्थितीत आर्थिक फसवणुकीला बळी पडू नका
- यूपी निवडणूक पुढे ढकलणार??; समाजवादी खासदार रामगोपाल यादवांची अलाहाबाद हायकोर्टावर टीका
- गुजरात : वडोदरामध्ये केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट , ४ कामगारांचा मृत्यू ; १० जखमी
- CRICKET NEWS : भज्जीची 23 वर्षांची कारकिर्द ! टीम इंडियाचा स्टार स्पिनर हरभजन सिंहची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती