• Download App
    इंधन दरवाढ सामान्यांच्या भल्यासाठीच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | Fuel price hike is good for common people - Chief Minister Uddhav Thackeray

    इंधन दरवाढ सामान्यांच्या भल्यासाठीच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगर भागातील भविष्यामध्ये वाहतुकीच्या आराखड्याबाबत आयोजन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करणार्या प्रवाशांचे घटते प्रमाण ही बाब चिंतेची असून या गोष्टीवर चर्चा करणे हा मुख्य विषय या कार्यशाळेमध्ये होता. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढावे यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मार्फत भक्कम पावले उचलली जात आहेत. असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

    Fuel price hike is good for common people – Chief Minister Uddhav Thackeray

    यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिशय मिश्किल भाषेमध्ये केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘इंधन दरवाढ ही सर्वसामान्यांच्या भल्यासाठी केली आहे.’ असा टोला त्यांनी लगावला.


    Fuel price hike : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्राेलची शंभरी पार; इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले


    पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, कुणालाही ट्राफिकमध्ये गाडी चालवायला आवडत नाही. सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवाशांचे प्रमाण कमी होत आहे. बहुतेक हे केंद्र सरकारच्या लक्षात आले असावे. आणि म्हणून त्यांनी इंधन दरवाढ केली आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले हे आपल्या भल्यासाठीच आहे. तुम्हाला वाटत असावे, मी टीकात्मक बोलतोय. पण तुम्ही सांगा वाढलेले इंधनाचे दर परवडले नाहीत तर लोक सार्वजनिक वाहतूकीकडे वळतातच. त्यामुळे चांगल्या हेतूने इंधनवाढ होत असेल तर आपण लक्षात घेत नाही. असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

    Fuel price hike is good for common people – Chief Minister Uddhav Thackeray

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल