वृत्तसंस्था
पुणे : कोरोना काळात निर्बंध लावले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले होते. राज्य सरकारने गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला होता. मागील अनेक महिन्यांपासून अनेक गरजू याचा लाभ घेत होते. ‘Free’ Shivbhojan Thali started by Mahavikas Aghadi government closed; Now you have to pay 10 rupees
मात्र. मंगळवारपासून ही मोफत शिवभोजन थाळी बंद केली आहे. यापुढे आता थाळीसाठी १० रूपये मोजावे लागणार आहे. याबाबतची माहिती शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत मिळून ११ ठिकाणी ही थाळी दिली होती. वाढता प्रतिसाद लक्षात घेता दोन्ही ठिकाणी सध्या ३७ केंद्रे आहेत. या माध्यमातून दररोज ६ हजार ३८ जणांना भोजन देण्यात येत आहे. आता नागरिकांना दहा रुपये केंद्र चालकाला द्यावे लागणार आहे.
केंद्रचालकांना सरकारकडून प्रत्येक थाळीमागे ४० रुपये अनुदान मिळत आहेत तर दहा रुपये ग्राहकाकडून मिळतात. हे अनुदान पुरवठा विभागाकडून चालकाच्या थेट बँक खात्यात दर १५ दिवसांनी जमा करण्यात येतात. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती.
‘Free’ Shivbhojan Thali started by Mahavikas Aghadi government closed; Now you have to pay 10 rupees
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेस दहशतवादाची जननी, नेहरूंचा रामावर विश्वास, इंदिराजींनी संतांवर गोळक्षबार केला तर सोनियांनी रामाचे अस्तित्व नाकारले, योगी आदित्यनाथांचा आरोप
- अफगणिस्थानचे माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या घणात सोन्याच्या वीटा, डॉलर्सच्या बंडलाह सापडले ४८ कोटी, तालीबानचा दावा
- किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण
- इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी