साेने खरेदी करण्यासाठी नांदेड ते पुणे प्रवास करुन आलेल्या एका सराफाच्या व्यक्तीला पुण्यात कार मधून आलेल्या चार अनाेळखी इसमांनी हेरले. त्यास अँटी कऱप्शनचे अधिकारी असल्याचे सांगून पिस्तुलचा धाक दाखवून संबंधित चोरट्यांनी १७ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. Four unknown persons theives १७ lakhs rupees near Swarget,pune area
विशेष प्रतिनिधी
पुणे -साेने खरेदी करण्यासाठी नांदेड ते पुणे प्रवास करुन आलेल्या एका सराफाच्या व्यक्तीला पुण्यातील स्वारगेट परिसरातील वेगासेंटर जवळ ट्रॅव्हलसच्या थांब्या जवळील फुटपाथवर कार मधून चार आलेल्या अनाेळखी इसमांनी पकडले. त्यास अँटी कऱप्शनचे अधिकारी असल्याचे सांगून शस्त्राचा धाक दाखवून संबंधित भामटयांनी १७ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज व बॅग लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत स्वारगेट पाेलीस ठाण्यात मधुरम सत्यनारायण साेनी (वय-२७,रा.नांदेड) यांनी पाेलीसांकडे चार अनाेळखी इसमां विराेधात फिर्याद दिली आहे. सात मार्च राेजी सकाळी साडेसहा वाजण्याचे सुमारास साेनी यांचा कर्मचारी शंकर भालेराव हा साेने खरेदी करता नांदेड ते पुणे असा प्रवास करुन आला हाेता. स्वारगेट परिसरात ताे थांबला असताना, काळया रंगाचे कार मधून त्याठिकाणी चार अनाेळखी व्यक्ती येऊन त्यांनी शंकरच्या खांद्यावर हात टाकुन त्याला अँटी करप्शनचे अधिकारी असल्याचे सांगितले.
त्यानंतर पिस्टल सारख्या शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने त्याला कार मध्ये बसवून त्याचे ताब्यातील १७ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चाेरुन नेला.भालेराव याला आरोपींनी पुणे – नाशिक महामार्गावरील खेड येथे सोडून दिले.त्यानंतर त्याने घडलेली घटना मालकाला दिली व याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत पुढील तपास स्वारगेट पाेलीस करत आहे.