• Download App
    ठाकरे गटाला आणखी एक धक्का! माजीमंत्री दीपक सावंतांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश Former minister Dr Deepak Sawant from the Uddhav Thackeray faction joins CM Eknath Shindes Shiv Sena

    ठाकरे गटाला आणखी एक धक्का! माजीमंत्री दीपक सावंतांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

    दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती.

    प्रतिनिधी

    मुंबई : उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून यांच्याकडून राजकीय धक्के बसणे अद्याप सुरूच आहेत. आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे दीपक सावंत हे उद्ध ठाकरेंचे निकवटर्तीय म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी पक्ष सोडल्याने ठाकरे गटाला भगदाड पडू शकते, असे बोलले जात आहे.  Former minister Dr Deepak Sawant from the Uddhav Thackeray faction joins CM Eknath Shindes Shiv Sena


    यह एक चिराग कई आँधीयों पे भारी है!!; देवेंद्र फडणवीसांचा टोला धनंजय मुंडेंना, पण निशाणा पवारांवर!!


    ‘मी डॉ. दीपक सावंत यांचे शिवसेना पक्षात स्वागत करतो. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दीपक सावंत हे शिंदे गटाचं मुख्यालय असणाऱ्या बाळासाहेब भवनमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दीपक सावंत यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.  दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. याच नाराजीमुळे उद्धव ठाकरे आणि दीपक सावंत यांच्यात अंतर निर्माण झाल्याचं बोललं जात होतं.

    नुकतंच ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा शुभम देसाईने शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला होता.

    Former minister Dr Deepak Sawant from the Uddhav Thackeray faction joins CM Eknath Shindes Shiv Sena

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक