वृत्तसंस्था
मुंबई – मुंबईतले बारमालक आणि रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात सक्तवसूली संचलनालयाची अर्थात ED चौकशी टाळण्यासाठी सुप्रिम कोर्टापर्यंत धावाधाव करणाऱे आणि राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख आजही ED कार्यालयात पोहोचले नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांचे वकील इंदर पाल सिंग हे ईडीच्या मुंबईतल्या कार्यालयात पोहोचले आहेत. Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh’s lawyer Inderpal Singh arrives at the office of Enforcement Directorate (ED) in Mumbai
तत्पूर्वी, अनिल देशमुख यांनी आपल्यावरची ईडीची चौकशी न्याय्य पध्दतीने होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पण त्यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे टाळले. उलट त्यांनी ईडीला पत्र पाठविले आहे. आणि त्यात त्यांनी आपल्या विरोधात सुरू असलेली चौकशी ही पारदर्शी नसल्याचा आरोप केला आहे. तसेच तिसऱ्या समन्सनंतरही आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
माझ्या अर्जावर काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. म्हणून त्याचा निर्णय येईपर्यंत थांबावे लागेल. त्यामुळे मी आज ईडी कार्यालयात हजर राहू शकत नाही, असे देशमुखांनी पत्रात म्हटले आहे. ईडीचा आपल्याविरोधात सुरु असलेली चौकशी आणि तपास हा पारदर्शी नसल्याचाही आरोप त्यांनी यात केला आहे.
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh’s lawyer Inderpal Singh arrives at the office of Enforcement Directorate (ED) in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद, आर्थिक संकटामुळे जळगावात 2 व्यावसायिकांच्या आत्महत्या
- Maharashtra Assembly Monsoon session 2021 : पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, हे प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता, वाचा अध्यादेशांची यादी
- अमेरिकेत पर्यटकांना अंतराळात ९० किलोमीटर उंचीवरून पृथ्वी पाहण्याची संधी
- उत्तर भारतातील राज्यांना उष्णतेचा तर ईशान्येकडील राज्यांना पावसाचा तडाखा
- कोरोनाच्या लाटेत अँटिबायोटिक्सच्या खपात प्रचंड मोठी वाढ