• Download App
    आली जीवनदायीनी ऑक्सिजन एक्सप्रेस:विशाखापट्टणम् टू नाशिक व्हाया नागपूर ...! first Oxygen Express reached in maharashtra

    आली जीवनदायीनी ऑक्सिजन एक्सप्रेस:महाराष्ट्राच्या मदतीला दिल्ली धावली;विशाखापट्टणम् टू नाशिक व्हाया नागपूर …

    • पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली असल्याची माहिती समोर येताच महाराष्ट्राला हायसं वाटलं आहे. 

    • महाराष्ट्रासाठी ही मोठी गुडन्यूज आहे . ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ नागपुरातून निघाली आहे. सकाळी नाशिकला पोहोचणार.


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर:महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन अभावी संकटाचा सामना करतो आहे. अशात उद्धव ठाकरे  सरकारने  मोदी सरकारकडे मदत मागीतली. त्यावर तत्परतेने काम करत मोदी सरकारने महाराष्ट्रात ऑक्सिजन रेल्वेने पुरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑक्सिजनचे टँकर हे इतर राज्यांमधून रवाना झाले होते. ते महाराष्ट्रात पोहचले आहेत. विशाखापट्टणमहून ऑक्सिजन भरून निघालेले हे टँकर्स गोंदियामार्गे, नागपूर, नाशिक आणि मुंबईत पोहचणार आहेत. नागपूरला हे टँकर पोहचले आहेत.तर उद्या सकाळी नाशिकला पोहचतील.first Oxygen Express reached in maharashtra

    विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस आज सायंकाळी, 8.10 वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली. नागपूर स्थानकात 3 टँकर उतरविल्या नंतर उर्वरित टँकर नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेस उद्या सकाळी नाशिक रोड स्थानकात पोहोचेल.

    ऑक्सिजन एक्सप्रेस राज्यात दाखल झाल्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे.

    या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.

    राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात आली आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टणम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

    first Oxygen Express reached in maharashtra

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!