• Download App
    इंजेन्युटी’चे मंगळावर दुसऱ्यांदा उड्डाण Enjunity land on Mars

    इंजेन्युटी’चे मंगळावर दुसऱ्यांदा उड्डाण

    वृत्तसंस्था

    केप कॅनव्हेराल – मंगळ ग्रहावर लँड झालेल्या ‘नासा’च्या ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने दुसऱ्यांदा चाचणी उड्डाण केले. Enjunity land on Mars

    ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने काल ५२ सेकंद उड्डाण करत १६ फूट उंची गाठली. याशिवाय सात फूटापर्यंत बाजूच्या दिशेनेही ते गेले. पहिल्या चाचणीवेळी हे हेलिकॉप्टरने १० फुटांची उंची गाठली होती, तर ते ३९ सेकंद हवेत होते.



    राइट बंधूंनी १९०३ मध्ये प्रथम उडविलेल्या विमानाचा एक बारीक तुकडा ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरमध्ये ठेवण्यात आला आहे. मंगळावर हेलिकॉप्टर उडविण्यात कोणत्या अडचणी येतात, याचा अभ्यास आणि चाचणी सध्या सुरु आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीवरील वातावरणाच्या तुलनेत अत्यंत विरळ आहे.

    येत्या एक ते दीड आठवड्यात आणखी तीन चाचण्या घेण्याचा ‘नासा’चे नियोजन आहे. ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने सोमवारी प्रथम उड्डाण केल्याने ते ‘परग्रहावर उडालेले पहिले हेलिकॉप्टर’ ठरले होते.

    Enjunity land on Mars

    महत्वाच्या’ बातम्या 

    Related posts

    Venezuela : व्हेनेझुएलात पुन्हा 5.6 तीव्रतेचा भूकंप; आतापर्यंत 1430 मृत्यू, 3300 जखमी; 72 तासांनंतर 68 हजार जण अजूनही बेपत्ता

    Karachi : पाकच्या कराचीत पॅरामिलिट्री हेडक्वार्टरवर अतिरेकी हल्ला; 4 सुरक्षा रेंजर्ससह 6 अतिरेकी ठार

    Europe Heatwave : फ्रान्समध्ये उष्णतेमुळे 1000 लोकांचा मृत्यू; जर्मनी, स्पेन, ब्रिटनसह 16 देशांमध्ये रेकॉर्डतोड उष्णता; रस्ते वितळले, शाळा बंद, जंगलांना आग