फिल्म इंडस्ट्रीत बॅक स्टेज कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला पार्टीच्या निमित्ताने घेऊन जात दिग्दर्शकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे
प्रतिनिधी
पुणे –फिल्म इंडस्ट्रीत बॅक स्टेज कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला पार्टीच्या निमित्ताने घेऊन जात दिग्दर्शकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पाेलीस ठाण्यात पिडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर आराेपी अमित प्रेमचंद सिटलानी (वं-४०,रा.कळस,पुणे) या अराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Film director raped to jouniar back stage artist in pune
सदर तरुणी ही पुण्यात कात्रज भागात रहाण्यास असून ती फिल्म इंडस्ट्री मध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करते. तर, आराेपी अमित सिटलानी हा कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करताे. एका मित्राच्या ओळखीतून त्याची संबंधित तरुणीशी ओळख झाली. अमित सिटलानी याने मे २०१७ मध्ये पुण्यातील टिंगरेनगर येथे एका मित्राच्या फ्लॅटवर तरुणीस पार्टीकरिता नेले हाेते.
त्याठिकाणी त्याने तिला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. त्यानंतर तरुणीला बदनामी करण्याची धमकी देऊन तसेच तिचे अश्लिल व्हिडिओ बनविल्याचे सांगत तिच्यावर वेळाेवेळी बलात्कार करत राहिला.
तरुणीला तिचे अश्लिल व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला वेगवेगळया हाॅटेलवर नेऊन तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. तसेच तिला शिवीगाळ व हाताने मारहाण केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने याबाबत पाेलीसांकडे धाव घेत आराेपी विराेधात तक्रार दाखल केली.
सुरुवातीला पिडित तरुणीवर बलात्कार झाला त्यावेळी ती अल्पवयीन हाेती त्यामुळे याप्रकरणात पाेस्काेचे कलम वाढविण्याबाबत ही पाेलीस प्रयत्न करत आहे. पाेलीसांनी याप्रकरणी आराेपीला अटक केली असून याबाबतचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम करत आहे.
Film director raped to jouniar back stage artist in pune
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व दुकानांवर मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
- इंधनाचे दर वाढवून केंद्र सरकार सामान्यांचे खिशातील पैसे लुटते – नाना पटाेले
- BJP – AAP : भाजप-आप आंदोलनात आमने-सामने; दिल्लीत केजरीवाल टार्गेटवर तर मुंबईत दरेकर टार्गेटवर!!
- आसाम व मेघालयाचा सीमाप्रश्न सुटला; गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या