• Download App
    ‘नमो’ शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात येणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेFarmers will be given honor fund through NAMO Shetkari Samman Yojana  Chief Minister Eknath Shinde

    ‘नमो’ शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    शिर्डी येथे थीम पार्क उभारण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. असंही सांगितलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे ‘महापशुधन एक्स्पो-२०२३’ चा समारोप झाला. पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार सदाशिव लोखंडे आणि डॉ. सुजय विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. Farmers will be given honor fund through NAMO Shetkari Samman Yojana  Chief Minister Eknath Shinde

    यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘’शेतकऱ्यांना न्याय देणारे हे सरकार आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात येणार आहे. पंचामृतामध्ये शाश्वत शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे.’’

    याचबरोबर ‘’शेतकरी हा आपला केंद्रबिंदू असून शेतकरी आदर्श मानूनच शासन काम करत आहे. महापशुधन एक्स्पोमधून शेतकऱ्यांना विविध विषयांची माहिती देण्यात आली. ८ लाख शेतकरी पशु पालकांनी याला भेट दिली आहे.’’ असंही त्यांनी सांगितलं.

    याशिवाय ‘’राज्यात शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजे हा आमचा एकच आणि महत्त्वाचा अजेंडा असून त्यासाठी हे सरकार काम करीत आहे. शिर्डी येथे थीम पार्क उभारण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

    Farmers will be given honor fund through NAMO Shetkari Samman Yojana  Chief Minister Eknath Shinde

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!