• Download App
    विदर्भातील शेतकऱ्यांनी काढला 'एल्गार' मोर्चा; सोयाबीनला ८ हजार, कापसाला १२ हजार भाव देण्याची मागणी । Farmers in Vidarbha Aggressive: conducted 'Elgar' Morcha

    विदर्भातील शेतकऱ्यांनी काढला ‘एल्गार’ मोर्चा; सोयाबीनला ८ हजार, कापसाला १२ हजार भाव देण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : राज्यातील सोयाबीन व कापसाला भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून हजारो शेतकरी सहभागी झाले होते. Farmers in Vidarbha Aggressive: conducted ‘Elgar’ Morcha

    अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही,अशी परिस्थिती राज्यभर निर्माण झाली आहे. शासनाने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असून सरकारने सोयाबीनला प्रति क्विंटल८ हजार रुपये तर कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव द्यावा, सोयाबीन आयात थांबवावी, पामतेल आणि खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन खंडित करणे देखील थांबवावे, यासह इतर मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला, चिखली रोडवरील मोठी देवी मंदिरापासून एल्गार करत संपूर्ण शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

    सदर मागण्या ११ नोव्हेंबरपर्यंत शासनाने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा १२ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यभर सोयाबीन आणि कापसाचे आंदोलन पेटणार असून शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत.असा इशारा देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.

    • स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा
    • जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा
    • संपूर्ण विदर्भातून हजारो शेतकरी सहभागी
    • शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
    • ११ नोव्हेंबरपर्यंत महाविकास सरकारला मुदत
    • १२ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलनाचा इशारा
    • सोयाबीन कापसाला भाव देण्याची आग्रही मागणी

    Farmers in Vidarbha Aggressive: conducted ‘Elgar’ Morcha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस