Thursday, 1 May 2025
  • Download App
    आमने-सामने : प्रियंका गांधीचा पंतप्रधान मोदींना सवाल तर देवेंद्र फडणवीसांचा प्रति'सवाल';कोरोनामुळे राजकारण तापले।Face-to-face: Priyanka Gandhi's question to PM Modi, Devendra Fadnavis's 'question'

    आमने-सामने : प्रियंका गांधीचा पंतप्रधान मोदींना सवाल तर देवेंद्र फडणवीसांचा प्रति’सवाल’;कोरोनामुळे राजकारण तापले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती . त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि गांधी परिवाराला प्रत्युत्तर दिले आहे.कोरोनाच्या या संकट काळात काँग्रेस नकारात्मकता पसरवत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हण्टले आहे. प्रियंका गांधी,राहुल गांधी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग पत्र लिहून सल्ला दिला. मात्र, यांनी याच सूचना महारष्ट्र सरकारला का दिल्या नाहीत? Face-to-face: Priyanka Gandhi’s question to PM Modi, Devendra Fadnavis’s ‘question’

    देवेंद्र फडणवीस म्हणाले , असं दिसत आहे की, “काँग्रेस आणि गांधी परिवार नकारात्मक वातावरण निर्माण करत आहे. प्रियंका गांधींना विचारु इच्छितो की, कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीसंदर्भात महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली का? तेथे काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं का? कोरोनामुळे एकूण मृत्यूंपैकी 38 ते 40 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत.”



    सक्रिय रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील रूग्ण 35 ते 37 टक्के आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक संसर्ग होता मग त्यावेळी राज्य सरकारने तयारी का केली नाही? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

    केंद्र सरकारवर दुसऱ्या लाटेसाठी तयारी केली नसल्याची प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी केली होती. यावर फडणवीस यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त होती. तरिही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी महाराष्ट्रात का तयारी केली गेली नाही असा प्रश्न फडणीसांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारला सल्ला देण्यापेक्षा प्रियांका गांधींनी महाराष्ट्र सरकारला का सल्ला दिला नाही असा प्रश्नही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

    प्रियंका गांधींनी मोदींवर केली होती टीका

    देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटलं होतं की, कोरोनामुळे लोक मृत्यूमुखी पडत आहेत आणि ते मोठ मोठ्या सभांमध्ये जाऊन हसत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ आपली प्रतिमा चमकवण्याच्या मागे लागलेलं आहे.

    Face-to-face: Priyanka Gandhi’s question to PM Modi, Devendra Fadnavis’s ‘question’

    Related posts

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!

    Icon News Hub