विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या महफुज अझीम खान (वय २१) याला राज्य सायबर विभागाने उत्तर प्रदेशातून अटक केली.अॅड. अटलबिहारी दुबे यांच्या तक्रारीवरून सायबर विभागाने ही कारवाई केली.Face book account of DG hacked
त्यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आयपी ॲड्रेसच्या मदतीने आग्रा येथून सवन अझीम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचा मुलगा महफुज खान त्याच्या नावावरील मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सायबर विभागाला मिळालेल्या माहितीनंतर त्याला नोटीस पाठवून सायबर विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सोमवारी सांगण्यात आले होते. तेथे आल्यानंतर आरोपीनेच पांडे यांच्या नावाची बनावट प्रोफाईल तयार केल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला याप्रकरणी अटक केली.
याप्रकरणी सायबर तोतयागिरी केल्याप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयापुढे हजर केले होते. तेथे न्यायालयाने त्याला २० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.तक्रारदार दुबे यांना या बनावट फेसबुक प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती; पण महासंचालक पांडे फेसबुकवर दुबे यांचे फ्रेंड होते.
त्यानंतरही नव्या प्रोफाईलवरून त्यांना रिक्वेस्ट आल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पांडे यांच्याकडे विचारणा केली असता ती फेसबुक प्रोफाईल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अखेर दुबे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
Face book account of DG hacked
महत्वाच्या बातम्या
- उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, आईला भेटण्यासाठी आले होते अधिवेशन अर्ध्यावर सोडून
- अमर,अकबर,अँथनी यांची तीन दिशेला तीन तोंड, एकमेंकांच्या पायात पाय घालून पडणारे सरकार, रावसाहेब दानवे यांची टीका
- तू माझा मुलगा म्हणत राहूल गांधी यांना महिलेने दिली मिठाई
- सिरम इन्स्टिट्यूट कच्चा मालाबाबत होणार आत्मनिर्भर, अर्धी कंपनीच घेतली विकत