• Download App
    उच्चभ्रु सोसायटीत सुरु सेक्स रॅकेटचा पर्दाफाश । Exposed sex racket started in high society

    उच्चभ्रु सोसायटीत सुरु सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.येथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. वेश्या व्यवसाय चालविणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे. Exposed sex racket started in high society


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.येथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. वेश्या व्यवसाय चालविणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.

    महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय ३४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान), पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या एजंटची नावे आहेत, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांना बिबवेवाडी येथील रासकर पॅलेस या उच्चभ्रु सोसायटीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली.



    त्यानुसार, पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली.त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला.तेथे वेश्याव्यवसाय करुन घेणार्‍या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले.तसेच दोघा एजंटना अटक करण्यात आली.कारवाईच्या वेळी रोख ४ हजार रुपये, तीन मोबाईल, कंडोमची पाकिटे तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.पिडित महिलांना हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशन येथे ठेवण्यात आले आहे.

    Exposed sex racket started in high society

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील