वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील नवी सांगवी परिसरात बुधवारी मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात दोन जण ६० टक्के भाजले.सांगवी पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले,Explosion while filling gas cylinder in Pune; Two burned 60 percent
‘बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोघे मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलिंडरमध्ये बेकायदा स्वयंपाकाचा गॅस रिफिल करत असताना ही घटना घडली. या स्फोटात दोन्ही व्यक्ती गंभीर भाजल्या गेल्या. त्यांना तातडीने ससून सामान्य रुग्णालयात आणि तेथून खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
आम्हाला डॉक्टरांनी सांगितले आहे की दोघे जवळपास ६० टक्के भाजले असून दोघेही गंभीर आहेत.’ वरिष्ठ निरीक्षक टोणपे म्हणाले, ‘आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दोघांनी सिलिंडर कोठून आणले याचाही तपास करणार आहोत.’
Explosion while filling gas cylinder in Pune; Two burned 60 percent
महत्त्वाच्या बातम्या
- महुआ मोईत्रांची वाढती लोकप्रियता ममतांना सहन होईना, वाढत्या गटबाजीवरून ममतांनी मोईत्रांना जाहीर सभेत सुनावले
- माणुसकीच सोडली, जनरल बिपिन रावत यांच्यावर टीका करत केरळच्या सरकारी वकील म्हणाल्या ते पवित्र नव्हते
- राम जन्मभूमी निकालानंतर सर्वोत्तम वाईन मागवून केले सेलीब्रेशन, माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी केला खुलासा
- भारतातील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी कायम