Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच हेही अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. Ex CM Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Petrol Hike Issue
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच हेही अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एकूणच ठाकरे-पवार सरकारला घेरण्यासाठी विरोधकांच्या भात्यात कोणकोणते मुद्दे आहेत, याचा पाढाच त्यांनी माध्यमांसमोर वाचला. यावेळी त्यांनी कोरोना काळातील भष्ट्राचार, शिवभोजन योजनेतील भष्ट्राचार, अधिकाऱ्यांचं वसुलीचं टार्गेट, प्रस्ताविक कायदे, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आदी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला.
पेट्रोल महाग ठेवून, दारू स्वस्त करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, फडणवीस पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचा भाव पाच आणि दहा रुपयाने कमी केला. 27 राज्यांनी व्हॅट कमी करून पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्यांनी इंधनाचे भाव कमी केले नाही. पैसे नाही सांगतात पण त्याचवेळी विदेशी मद्यावरचा टॅक्स 50 टक्के कमी करण्याचं पाप या सरकारने केलं. त्यामुळे हे सरकार कुणासाठी काम करतं?, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाही पण दारूचे भाव कमी करतं. म्हणजे एकेकाळी नारा होता. इंदिराजींच्या काळात तोच द्यावा लागेल. ‘वाह रे एमव्हीए तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’, अशी अवस्था या सरकारने आणली आहे.
चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार
तत्पूर्वी, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर चर्चा झाली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्यापासून विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. या सरकारच्या परंपरेप्रमाणे जितकी लहानात लहान अधिवेशनं घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता येतील आणि जेवढी लोकशाही कुलूपबंद करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न या छोट्याशा अधिवेशनातून केला जातोय.”
अध्यक्ष निवड आवाजी मतदानाने घेण्याचा घाट
ते पुढे म्हणाले की, “12 आमदार बाहेर ठेवून अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची? याचा अर्थ हे सरकार किती असुरक्षित आहे हे दिसते. गुप्त मतदानाने निवडणूक घेण्याची पद्धत असताना हे नियमबाह्य मतदान करण्याची तयारी करत आहे. नियम डावलून प्रस्ताव सादर करणार आहेत. लोकशाही कुलूप बंद करता येईल असं छोटे अधिवेशन सत्ताधारी घेत आहेत. राज्यात अधिवेशन घ्यायची मानसिकता नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. फक्त ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरू आहे.”
फडणवीसांनी ठाकरे सरकारवर आरोप करत म्हटले की, हे सरकार भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. विरोधकांनी बोलूच नये म्हणून एका वर्षासाठी आमदारांना निलंबित करण्याचं काम या सरकारच्या दबावाखाली होत आहे. आपल्या आमदारांवर यांचा विश्वास नाही, म्हणून यांनी आमचे आमदार निलंबित केले आहेत.
Ex CM Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Petrol Hike Issue
महत्त्वाच्या बातम्या
- शिवभोजन योजनेत भष्ट्राचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अपमान : देवेंद्र फडणवीस
- राज्यात लोकशाही बंद, केवळ ‘रोक’शाही किंवा ‘रोख’शाही सुरू, देवेंद्र फडणवीसांची झंझावाती पत्रकार परिषद, वाचा सविस्तर..
- 12 आमदार – 12 खासदार निलंबित ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला नेमका फरक!!
- नागपुरामध्ये अधिवेशन होत नसल्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना ३०० कोटीचा तोटा
- महाराष्ट्र २४ तासांत आणखी गारठणार ! थंडीचा हुडहुडी वाढेल;हवामान तज्ज्ञांचा इशारा
- लस प्रमाणपत्रावरचा मोदींचा फोटो हटवण्याची मागणी आली अंगलट ; भरावा लागणार १ लाख रुपयांचा दंड