विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्रातील दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासन कोरोना संकट आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ही दोन कारणं पुढे करून निवडणुका लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे.Elections for ten Municipal Corporations including Mumbai Proceed to the postponement
मुंबई, ठाणे आणि आणखी आठ महापालिकांचा कालावधी मार्च २०२२ अखेर संपणार आहे. पण १ फेब्रुवारी उलटला तरी या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. यामुळे राज्यातील दहा महापालिकांवर महाविकास आघाडी सरकार निवडणुका लांबणीवर टाकेल; अशी चर्चा जोरात आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारने न्यायालयात एक याचिका केली आहे. या याचिकेवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे. या दरम्यान महाराष्ट्र शासन निवडणुका पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकांवर प्रशासक नेमण्याचीही शक्यता आहे.
Elections for ten Municipal Corporations including Mumbai Proceed to the postponement
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युट्युबवर १ कोटी सब्सक्रायबर : जगातील नेत्यांमध्ये पहिला नंबर
- ई.एस.आय.सी.च्या रूग्णालयात डॉक्टर्स, नर्सेसची तातडीने भरती मंत्री राजेश टोपे यांची माहिती
- हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांची भरती १५ आघाडीच्या युद्धनौकांवर आता २८ महिला अधिकारी
- महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे विश्लेषण सत्र