स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्रित लढतात का, याबाबत उत्सुकता असेल. शिवसेना आणि कॉँग्रेस प्रत्येकी दोन जागा लढत असल्याने राष्ट्र्रवादी कॉँग्रेस मदत करणार का? हा प्रश्न असल्याने महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे. Elections for six seats in the Legislative Council will be held on December 10
विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्रित लढतात का, याबाबत उत्सुकता असेल. शिवसेना आणि कॉँग्रेस प्रत्येकी दोन जागा लढत असल्याने राष्ट्र्रवादी कॉँग्रेस मदत करणार का? हा प्रश्न असल्याने महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे.
मुंबईतील दोन तसेच कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि नागपूर या सहा जागांसाठी ही निवडणूक होईल. मुंबईत शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार आणि विद्यमान राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल, अकोला-बुलडाणा-वाशिममध्ये शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया, नागपुरात भाजपचे गिरीश व्यास यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात.
सध्या भाजपकडे नागपूर आणि धुळे-नंदूरबार अशा दोन जागा आहेत. शिवसेनेकडे अकोल्याची आणि मुंबईची जागा आहे. कॉँग्रेसकडे मुंबई आणि कोल्हापूरची जागा आहे. शिवसेनेकडून रामदास कदम यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार का? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत प्रथमच शिवसेनेची कसोटी लागणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना १६ नोव्हेंबर रोजी निघणार आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. २४ नोव्हेंबरला छाननी तर २६ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून १४ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Elections for six seats in the Legislative Council will be held on December 10
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल