• Download App
    एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंना डिवचणारी वक्तव्ये थांबवा; दीपक केसरकरांचा भाजप नेत्यांना इशारा!!; राजकीय इंगित काय??|Eknath Shinde Rebellion: Stop making statements against Uddhav Thackeray; Deepak Kesarkar warns BJP leaders !!; What is the political implication

    एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंना डिवचणारी वक्तव्ये थांबवा; दीपक केसरकरांचा भाजप नेत्यांना इशारा!!; राजकीय इंगित काय??

    प्रतिनिधी

    मुंबई : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड जल्लोष आहे. देवेंद्र फडणवीस सरकार येणार म्हणून ठिकठिकाणी जल्लोष साजरा होऊन मिठाई वाटली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सावधानतेचा एक गंभीर इशारा आला आहे आणि तो अन्य कोणाकडून आला नसून थेट एकनाथ शिंदे गटाकडून आला आहे!!Eknath Shinde Rebellion: Stop making statements against Uddhav Thackeray; Deepak Kesarkar warns BJP leaders !!; What is the political implication

    उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्ह वरून काल राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भाजपच्या नेत्यांचे एकमेकांना पेढे भरवल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. अनेक नेत्यांनी पुढे येऊन उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केली.



    या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाने अतिशय सावध भूमिका घेत भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले नव्हते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधात हे बंड होते. आजही उद्धव ठाकरे यांनाच आम्ही नेता मानतो. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या बद्दल बोलताना मर्यादा पाळली पाहिजे. अनावश्यक टीका टाळली पाहिजे, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे.

    उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येण्यापूर्वी एकनाथ शिंदे गटाने दिलेला हा इशारा हा भाजप मधल्या नारायण राणे गटाशी संबंधित आहे. नारायण राणे यांचे दोन पुत्र निलेश आणि नितेश हे उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करतात. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दुखावण्याची वक्तव्ये थांबवा हा इशारा दिल्याचे स्पष्ट होत आहे.

    एकनाथ शिंदे गटाची राजकीय गरज

    त्याच बरोबर यामागचे राजकीय इंगित देखील वेगळे आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला विधिमंडळात आपणच शिवसेना असल्याचे एस्टॅब्लिश करायचे आहे. त्यांना शिवसेना विधिमंडळ गटाची अधिमान्यता निवडणूक आयोगाकडून मिळवायची आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय पंगा घेण्याची इच्छा नाही. आणि शिवाय एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र राहण्यावर तसेच त्यांना शिवसेना म्हणून अधिमान्यता मिळण्यावर आगामी देवेंद्र सरकार फडणवीस राजकीय अस्तित्व देखील बऱ्यापैकी अवलंबून असणार आहे.

    त्यामुळे एकनाथ शिंदे गटाने कायम आपला आपल्या शरसंधानाचा रोख राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांवर ठेवत आपले उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही भांडण नाही. संजय राऊत यांच्यामुळे राजकीय भांडण वाढले असा ठेवला आहे. त्यातूनच दीपक केसरकर यांनी आज सकाळीच भाजपच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्ये थांबविण्याचा इशारा दिला आहे. आता याचा नेमका राजकीय परिणाम किती होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Eknath Shinde Rebellion: Stop making statements against Uddhav Thackeray; Deepak Kesarkar warns BJP leaders !!; What is the political implication

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!