प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांना मोठ्या संख्येने ठार करण्यात आले आहे, त्याचा बदला नक्षलवादी घेणार असल्याच्या धमक्या नक्षलवाद्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाने दिल्या. पण या धमक्यांना भीक न घालता एकनाथ शिंदे थेट गडचिरोलीत दाखल झाले. त्यांनी पोलिसांची भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले.Eknath Shinde celebrates Diwali with Gadchiroli police without begging Naxals
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलिस ठाण्याला भेट दिली. इतकेच नाही तर तिथल्या पोलिस जवानांच्या सोबत दिवाळीचा सणही शिंदे यांनी साजरा केला. अशा धमक्या खूप येतात. त्या धमक्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. धमक्यांबाबत ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ते तपास करत आहेत. धमक्यांचा परिणाम यापूर्वीही झाला नाही आणि आताही होणार नाही. गडचिरोलीच्या विकासाचे माझे काम सुरुच राहील, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या गडचिरोली दौऱ्यात स्पष्ट केले आहे.
नक्षलवादी कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना यावेळी दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. यावेळी गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल हे देखील उपस्थित होते.
Eknath Shinde celebrates Diwali with Gadchiroli police without begging Naxals
महत्त्वाच्या बातम्या
- ड्रॅगनचा थरकाप उडवणारा छळ : चीन उइघर मुस्लिमांचे लिव्हर आणि किडन्या विकून करतोय अब्जावधींची कमाई, रिपोर्टमध्ये दावा
- माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराच्या भवितव्याबाबत केले मोठे विधान, म्हणाले – भारतीयांचा विश्वास कमी झाला
- भुजबळांची सांगितला जेलचा अनुभव ; म्हणाले -‘दोन-अडीच वर्षे मी ही आर्थर रोड कारागृहात, जे लोक स्वागतासाठी होते तेच नंतर लक्ष ठेवण्यासाठी’
- वेगाने होणाऱ्या पृथ्वीवरील हवामान बदलांचा साक्षीदार ठरला फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्केट! भविष्याबद्दल व्यक्त केली चिंता