• Download App
    पोरकट आरोप - पोरकट प्रश्न!!; राज ठाकरे आणि पत्रकारांना शरद पवारांनी झटकलेED's raids on Ajit Pawar - Modi's visit

    अजितदादांवर ईडीचे छापे – मोदी भेट : पोरकट आरोप – पोरकट प्रश्न!!; राज ठाकरे आणि पत्रकारांना शरद पवारांनी झटकले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राज ठाकरे आणि पत्रकारांची खिल्ली उडवली.ED’s raids on Ajit Pawar – Modi’s visit

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर पडलेले छापे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच, “हा काय प्रश्न आहे? पोरकट आरोप आणि पोरकट प्रश्न”, अशा शब्दात शरद पवारांनी राज ठाकरे आणि पत्रकारांना झटकले. किंबहुना हा प्रश्न टाळण्याकडेच त्यांचा सुरवातीला भर दिसला. पण नंतर लगेच एक खासदार म्हणून वेगळ्या करण्यासाठी पंतप्रधानांना भेटू नये का? तसा मी त्यांना भेटलो. महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या 12 आमदारांवर आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पंतप्रधानांकडे मांडला, असे पवार म्हणाले. परंतु पत्रकारांनी पुन्हा एकदा मोदी भेटीचा आणि अजित पवार यांच्यावरील छाप्यांचा उल्लेख करताच पवार म्हणाले, अजित पवारांवर छापे पडले म्हणजे ते माझ्यावरच पडले. अजित पवार आणि मी वेगळे आहोत का? अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊ – बहिण नाहीत का?, असे सवाल त्यांनी चिडून पत्रकारांना केले. त्याच वेळी, “राज ठाकरे यांचे पोरकट आरोप आणि तुमचे पोरकट प्रश्न”, असे त्यांनी पत्रकारांना सुनावले.

    जेम्स लेन – बाबासाहेब पुरंदरे

    राज ठाकरे यांच्या विविध आरोपांचा शरद पवारांनी या पत्रकार परिषदेत समाचार घेतला. जेम्स लेन याला बाबासाहेब पुरंदरे यांनीच माहिती दिली. स्वतः जेम्स लेनने आपल्या पुस्तकात बाबासाहेबांचे त्यासाठी आभार मानले आहेत आणि बाबासाहेबांनी देखील कधीच याचा इन्कार केला नव्हता. त्यामुळे बाबासाहेबांच्या इतिहासाबद्दलची वस्तुस्थिती कोणी मांडली तर ती योग्यच आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, असे वक्तव्य करून शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे समर्थन केले.

    – मंदिरात प्रचाराचे नारळ फोडले

    त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या सर्व आरोपांना त्यांनी उत्तरे दिली. मी नास्तिक आहे, असे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. कारण मी माझ्या धार्मिकतेचा कुठेही गवगवा करत नाही. परंतु, मी 13 – 14 वेळा निवडणूक लढवली. त्यावेळी माझ्या प्रचाराचे नारळ मी बारामतीत एका मंदिरापाशी फोडले, याची आठवण शरद पवार यांनी करून दिली.

    राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महागाई, बेरोजगारी या गंभीर प्रश्नांचा उल्लेखही केला नाही. भाजपशी त्यांचे काही साटेलोटे असल्याशिवाय असे घडू शकत नाही. भाजपवर एका शब्दाने ते बोलत नाहीत आणि राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांवर टीका करतात यातूनच त्यांचे भाजपशी साटेलोटे दिसून येते, असे शरसंधान पवार यांनी साधले.

    राज ठाकरे यांनी आपला पक्ष इतरांना संपवणार आहे असे म्हटले आहे. ते खरेच आहे, असे खोचक उद्गार काढून शरद पवार म्हणाले, की महाराष्ट्राच्या जनतेने राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे आधीच दखल घेतली आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकही माणूस आला त्यांनी विधिमंडळात पाठवला नाही. सोनिया गांधी आणि आपल्यातल्या मतभेदांचा उल्लेख करताना शरद पवार म्हणाले, सोनिया गांधी यांनी पंतप्रधान बनवू नये असे माझे मत होते. माझे मतभेद काँग्रेसशी कधीच नव्हते. सोनिया गांधींशी देखील फक्त पंतप्रधानपदाबाबतच मतभेद होते. स्वतः त्यांनीच पंतप्रधानपद नाकारल्यानंतर तो प्रश्नही मिटला होता. त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांनी सुचवल्यानंतर आम्ही एकत्र आलो आणि महाराष्ट्रामध्ये सरकार बनवले. आजही महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित सत्तेवर आहेत, याची आठवण देखील शरद पवार यांनी करून दिली.

    मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे यांच्या वक्तव्याची राज्य सरकार व्यवस्थित दखल घेईल आणि त्यासंदर्भात पुढची कारवाई करेल, असे शरद पवारांनी सांगितले.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात हजर झाले आहेत याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यांच्या तब्येतीचा प्रश्न होता म्हणून ते घरातून काम करत होते. राज्याचा कारभार उत्तमच चालला होता. राज्यकारभाराच्या मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे कोणता अडथळा आला नाही. उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसून अस कारभार केला. त्यांचे कामकाज सकाळी 7.00वाजल्यापासून सुरू होत असते, याची आठवण शरद पवार यांनी करून दिली.

    ED’s raids on Ajit Pawar – Modi’s visit

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस