• Download App
    ईडी - इन्कम टॅक्सच्या कारवाया तेज; पवारांनी बोलवली राष्ट्रवादीची महत्वाची बैठकED - Income tax proceedings expedited

    ED IT actions : ईडी – इन्कम टॅक्सच्या कारवाया तेज; पवारांनी बोलवली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक

    प्रतिनिधी

    मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कारवायांना वेग आला असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कारखान्यावर इन्कम टॅक्सचे छापे सुरू आहेत. नवाब मलिक कोठडीत आहेत. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची 13.50 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ED – Income tax proceedings expedited

    या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींना वेग येत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजप आक्रमक होऊन राज्य सरकारला अडचणीत आणत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्वाची बैठक आज संध्याकाळी होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.



    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा आणि महाराष्ट्रातील
    राजकीय घडामोडींवर शरद पवार चर्चा करणार आहेत.

    राष्ट्रवादीचे बैठक संध्याकाळी 5.30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत

    ED – Income tax proceedings expedited

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा