- याच प्रकरणात ईडीने आयपीएस अधिकारी जी श्रीधर यांना देखील समन्स बजावलं आहे.
- अकोला या ठिकाणी ते पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात.
विशेष प्रतिनिधी
मुंबई: अनिल देशमुखांच्या 100 कोटी वसुली प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे.या वसुली प्रकरणात डीसीपी राहुल श्रीरामे यांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. राहुल श्रीरामे हे पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी म्हणून काम करतात. त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. त्यांचा जबाब आता नोंदवण्यात आला आहे.ED ANIL DESHMUKH: In the case of recovery of Anil Deshmukh, ED reported the reply of Pune DCP
अनिल देशमुख यांच्याविरोधात बदल्यांमध्ये फेरफार आणि ढवळाढवळ यासंबंधीचाही गुन्हा आहे. या प्रकरणात श्रीरामे यांची चौकशी करण्यात आली. येत्या काळात आणखी काही डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते.
7 डिसेंबरला महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे हेदेखील ईडीसमोर हजर झाले होते.30 नोव्हेंबरला ते महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव या पदावरून ते निवृत्त झाले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी ईडीने या प्रकरणी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांचाही जबाब नोंदवला होता.
तसंच डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे आणि उपसचिव कैलास गायकवाड यांचीही चौकशी केली होती. त्यांचेही जबाबही या प्रकरणी नोंदवण्यात आले.
ED ANIL DESHMUKH: In the case of recovery of Anil Deshmukh, ED reported the reply of Pune DCP
महत्त्वाच्या बातम्या
- NAGPUR MP cultural Festival : नागपुरात खासदार महोत्सव! नितीन गडकरींनी सुरू केलेला महोत्सव ; कोव्हिड नियमांचे पालन करून दिवस सोहळा
- OMICRON : युरोपात कोरोनाचा कहर ; इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार
- तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम, माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले
- अभिनेत्री अलिया भट्टवर होणार कारवाई, हाय रिस्क संपर्कात येऊनही होम क्वारंटाईनचा भंग