• Download App
    भारतमातेच्या जयघोषाने दुमदुमलामी स्वराज्याची राजधानी; संभाजीराजेंनी रायगडावर केले ध्वजारोहण!!|Dumdumalami Swarajya capital with the shout of Mother India; Sambhaji Raj hoisted the flag at Raigad!!

    भारतमातेच्या जयघोषाने दुमदुमलामी स्वराज्याची राजधानी; संभाजीराजेंनी रायगडावर केले ध्वजारोहण!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सोमवारी देशभरात साजरा होत असताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.Dumdumalami Swarajya capital with the shout of Mother India; Sambhaji Raj hoisted the flag at Raigad!!

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांसह त्यांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.



    आपल्या पोस्टमधून संभाजीराजे छत्रपती यांनी असे म्हटले की, अगणित वीरांच्या बलिदानातून १९४७ साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, हे हुतात्मा भगतसिंहांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते.

    ६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडवर सार्वभौम स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे परचक्रात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकविला. स्वराज्य व स्वातंत्र्याचे मूर्तिमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आणि शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे, अशा भावना संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्ट मधून व्यक्त केल्या आहेत.

    Dumdumalami Swarajya capital with the shout of Mother India; Sambhaji Raj hoisted the flag at Raigad!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Navi Mumbai नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टम निर्माण केले जाणार

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Icon News Hub