• Download App
    शरद पवारांनी बैठकीत केलेल्या सकारात्मक सूचनांमुळे एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता : संजय राऊत | Due to the positive suggestions made by Sharad Pawar in the meeting, the issue of ST employees is likely to be resolved soon: Sanjay Raut

    शरद पवारांनी बैठकीत केलेल्या सकारात्मक सूचनांमुळे एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता – संजय राऊत

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे तर बरेच एसटी कर्मचारी कामावर रुजू होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. पण यांची देखील अडवणूक केली जात आहे. नुकताच उच्च न्यायालयाने असे केल्यास संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मुभा देखील महामंडळ आणि पोलिसांना दिली आहे.

    Due to the positive suggestions made by Sharad Pawar in the meeting, the issue of ST employees is likely to be resolved soon: Sanjay Raut

    या सर्व पाश्र्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांची बैठक झाली. राजकीय वर्तुळात या बैठकीबद्दल बरीच मोठी चर्चा रंगली होती. या चर्चेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकर सुटेल असे आश्वासन दिले आहे.


    Sharad Pawar : अनिल देशमुखांच्या अटकेवर संतापलेले शरद पवार म्हणाले- तुरुंगात टाकण्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल!


    ते म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी चर्चा करण्यात आली आहे. शरद पवार यांनी अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत देखील चर्चा केली आहे. आता शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे लवकरच यातून मार्ग निघेल असे दिसते आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात तेल ओतण्याचे काम बरेच लोक करत आहेत. एस टी कर्मचार्यांच्या प्रश्नांविषयी सर्वांना सहानुभूती आहे. ते जे करता येणे शक्य आहे ते सर्व सरकार करत आहे. शरद पवारांनी कालच्या बैठकीत केलेल्या काही सकारात्मक सूचनांमुळे हा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता दिसते आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    Due to the positive suggestions made by Sharad Pawar in the meeting, the issue of ST employees is likely to be resolved soon: Sanjay Raut

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ