• Download App
    डॉ. अमोल कोल्हेंच्या नथुरामच्या भूमिकेचे शरद पवारांकडून समर्थन!!Dr. Sharad Pawar's support for Amol Kolhe's role of Nathuram !!

    डॉ. अमोल कोल्हेंच्या नथुरामच्या भूमिकेचे शरद पवारांकडून समर्थन!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी “व्हाय आय किल्ड गांधी?” या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच डाॅ. अमोल कोल्हे यांच्या नथुरामच्या भूमिकेवरून फूट पडलेली दिसत आहे. परंतु, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डाॅ. अमोल कोल्हे यांच्या नथुरामच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.Dr. Sharad Pawar’s support for Amol Kolhe’s role of Nathuram !!

    डाॅ. अमोल कोल्हे हे कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्या नथुरामच्या भूमिकेकडे कलावंताच्या दृष्टीने बघितले पाहिजे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. त्याच वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या चित्रपटांमध्ये औरंगजेबाच्या भूमिकेचा तसेच रामायणातील रावणाच्या भूमिकेचाही दाखला दिला आहे. औरंगजेबाच्या भूमिका साकारणारे नट हे काही औरंगजेबाच्या विचारसरणीचे नसतात तसेच रावणाची भूमिका करणारे नट हे देखील सीतेचे अपहरण करणारे नसतात, असे शरद पवार म्हणाले.


    राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत; महाराष्ट्रात राजकीय वादळ


    डाॅ. अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका केली म्हणजे त्यांनी त्यांचे समर्थन केले असे होत नाही. फक्त कलावंत म्हणून त्यांनी ती भूमिका साकारली आहे. नथुरामने कोणते कृत्य केले हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि त्याचे समर्थन कोणी करू शकत नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. भाजप आणि संघामध्ये नथुराम चे समर्थन करणारे अनेक जण होते. भाजपवाले कधी महात्मा गांधींचे समर्थन झाले? असा खोचक सवाल देखील शरद पवार यांनी केला आहे.

    मात्र या मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका स्वीकारायलाच नको होती. त्यांच्या भूमिकेचे समर्थन होऊ शकत नाही, असे मत राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या चित्रपटाला आपण विरोध करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    Dr. Sharad Pawar’s support for Amol Kolhe’s role of Nathuram !!

    Related posts

    Chandrashekhar Bawankule : बोगस कुणबी प्रमाणपत्र काढल्यास कारवाई, चंद्रशेखर बावनकुळे यांची ओबीसी नेत्यांना मोर्चा रद्द करण्याची विनंती

    Devendra Fadnavis : नाशिकचे नवीन रिंग रोडचे आणि साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करा, दिरंगाई खपवून घेणार नाही!!

    Nilesh Ghaywal’ : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द होणार, बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचे उघड