विशेष प्रतिनिधी
भंडारा : भंडारा-पवनी रस्त्यात येणाºया दवडीपार ते पहेला गावात पर्यंतच्या 5 किलोमीटरचा रस्त्या वनविभागाच्या अंतर्गत येतो. त्याला डी-नोटिफाईड करण्यात आले आहे. मात्र वन विभागाचे काही निकम्मे अधिकारी काम थांबवून आहेत. तुम्ही मला काळे झेंडे न दाखविता या निकम्म्या अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवा, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.Dont show me black flags, show them to useless officials, said Nitin Gadkari
गडकरी यांच्या भंडारा दौऱ्या दरम्यान भंडारा-पवनी रस्त्यावर पहेला गावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. भंडारा-पवनी निलज मागार्चे कामकाज धिम्या गतीने सुरु आहे. या रस्त्याची अवस्था फार वाईट आहे.
त्यामुळे प्रचंड अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यानंतर नितीन गडकरी यांनी भर कार्यकर्मात मंचावर बोलताना वन अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी वन अधिकाºयांना खडेबोल सुनावले.
मी सरकारमध्ये आहे.
तुम्ही मला तीन-तीन वर्ष रस्त्याचे काम थांबविणाऱ्या आणि चीफ कनज्झरवेशन अधिकारी यांचे नावे द्या. मी या निकम्मे वन अधिकाऱ्यांचा सीआर खराब करून कारवाई करणार, अशी तंबीच त्यांनी जाहिर कार्यक्रमात दिली आहे.
Dont show me black flags, show them to useless officials, said Nitin Gadkari
महत्त्वाच्या बातम्या
- उद्या “झुंड” प्रदर्शित; आज महानायक सिद्धिविनायक चरणी…!!
- Maharashtra assembly session : गेल्या वेळच्या अधिवेशनात मांजरीचे “म्याव गाजले… यावेळी “साप” डोलतोय…!!
- Putin – Modi talks : 6 तासांसाठी हवाई हल्ले थांबवले!!; खारकीव्हमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढले… हे कसे घडले…??
- यशवंत जाधव : 2 कोटी, 1.5 कोटी, 130 कोटी, 200 कोटी… हे आकडे काय बोलतायत…??