कोरोना काळात राज्य सरकारने एकाही घटकाला मदत नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. ताळ्यावर नसलेल्या या सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. Don’t miss the opportunity to shock the government which is not on working for common man, appeals Devendra Fadnavis
विशेष प्रतिनिधी
देगलूर : कोरोना काळात राज्य सरकारने एकाही घटकाला मदत नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. ताळ्यावर नसलेल्या या सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देगलूर-बिलोली विधानसभा पोट-निवडणुकीसाठी देगलूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम या सरकारने बंद केले, वैधानिक विकास मंडळं बंद करून मराठवाड्याची कवच-कुंडलं काढून घेतली. हा मराठवाड्याच्या विकासाचा खून आहे.
विम्याचा राज्य सरकारचा हिस्साच मविआ सरकारने भरला नाही. त्यामुळे आज शेतकर्यांच्या डोळ्यात केवळ अश्रू आहेत.
कोरोना काळात राज्य सरकारने एकाही घटकाला मदत नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. केंद्राने दिलेले गरिबांसाठीचे अन्नही यांनी सडविले.
विकास-विरोधी, जन-विरोधी हे सरकार केवळ आणि केवळ लोकांच्या हक्काचे पैसे लुबाडण्यात व्यस्त आहे. सुभाष साबने यांना निवडून देऊन ताळ्यावर नसलेल्या या सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका!
राज्यातील सरकारची 2 वर्षांतील उपलब्धी काय असा सवाल करत फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार बंद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बंद, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद, स्मार्ट योजना बंद, ड्रीप इरिगेशन बंद, रस्त्यांची कामे धरणांची कामे,शेतकर्यांचा विमा,वीज बंद, शेतकर्यांना मदत बंदअसे हे केवळ बंद सरकार आहे. या सरकारने केला तो फक्त भ्रष्टाचार! केवळ छपाईचा आणि खाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू, हा एकमात्र कार्यक्रम सुरू! खाण्याचा हिशेब सुद्धा संगणकावर ठेवला आहे! महाराष्ट्रातील जनताच यांना धडा शिकवेल.
यावेळी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा , खा. प्रताप पाटील चिखलीकर , उमेदवार सुभाष साबने, माजी मंत्री बबनराव लोणीकर, राम शिंदे आदी उपस्थित होते.
Don’t miss the opportunity to shock the government which is not on working for common man, appeals Devendra Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या
- SAMEER WANKHEDE : समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो
- वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका
- बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच