• Download App
    महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य करू नका; जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य । Don't make any statement that Maharashtra will burn; Statement by Jitendra Awhad

    महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य करू नका; जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केले. Don’t make any statement that Maharashtra will burn; Statement by Jitendra Awhad

    ते म्हणाले, महाराष्ट्र शांत आहे.कुठेही क्लेश नाही. द्वेष दिसत नाही.सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहेत. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागले आहे. त्यांच्या खिशात पैसे नाहीत. गॅस महाग झाला. पेट्रोल – डिझेल महागले. भाज्या, केरोसिन महाग झाले.खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झाले. याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचे नाही ते इश्यू बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे.



    गॅसबद्दल, पेट्रोल – डिझेल महागाई याबद्दल बोला. ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला. श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना ‘राम नाम सत्य है’ बोलायला लावू नका असा स्पष्ट इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ‘मनसे’ चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर काढून टाकण्याबाबत वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बहुल मतदारसंघातून निवडून येणारे आव्हाड बोलत होते.

    Don’t make any statement that Maharashtra will burn; Statement by Jitendra Awhad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना