• Download App
    काळजाचं पाणी करणारी घटना, बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची फक्त 500 रुपयांसाठी हत्या, मृतदेह न्यायलाही नव्हते कुटुंबाकडे पैसे । Divyang Youth who came for a bank exam Brutally Killed in Aurangabad News

    काळजाचं पाणी करणारी घटना : बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची फक्त ५०० रुपयांसाठी हत्या, मृतदेह न्यायलाही नव्हते कुटुंबाकडे पैसे

    Aurangabad News : शहरात एका तरुणाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत बँकेची परीक्षेसाठी शहरात आलेल्या एका दिव्यांग तरुणाची हत्या करण्यात आली. परीक्षेला उशीर होऊ नये म्हणून या तरुणाने लिफ्ट मागितली आणि आरोपीनं कब्रस्तानात नेऊन त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून या गूढ खुनाचा उलगडा केला आहे. Divyang Youth who came for a bank exam Brutally Killed in Aurangabad News


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : शहरात एका तरुणाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत बँकेची परीक्षेसाठी शहरात आलेल्या एका दिव्यांग तरुणाची हत्या करण्यात आली. परीक्षेला उशीर होऊ नये म्हणून या तरुणाने लिफ्ट मागितली आणि आरोपीनं कब्रस्तानात नेऊन त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून या गूढ खुनाचा उलगडा केला आहे.

    काय आहे घटना?

    अहमदनगरातील पाथर्डीचा रहिवासी असलेला विकास चव्हाण हा दिव्यांग तरुण बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादेत आला होता. शुक्रवारी परीक्षा असल्याने त्याने आदल्या दिवशी रात्रीच औरंगाबाद गाठलं. एसटी रात्री दहाच्या सुमारास औरंगाबादेत पोहोचली. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या विकासने लॉज पैसे जातील म्हणून एसटी स्टँडवरच रात्र घालवली. शुक्रवारी सकाळी आठलाच परीक्षा असल्याने तो पहाटे लवकर उठून वाहन शोधू लागला. विकासला यावेळी एकही वाहन मिळाले नाही म्हणून त्याने एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली आणि इथेच त्याचा घात झाला.

    फक्त 500 रुपयांसाठी घेतला जीव

    मृत विकासला फिरोज खान या दुचाकीस्वाराने लिफ्ट देतो म्हणून सांगितले. परीक्षा केंद्र वेळेत गाठायचं असल्यानं विकासने होकार दिला. गाडीवरून निघाल्यावर काही अंतरावर जाताच आरोपी फिरोजने दुचाकी एका कब्रस्तानाजवळ नेली. विकासला संशय आल्याने तो लगेच खाली उतरला. मात्र, आरोपीने बळजबरी त्याला आत ओढत नेले. कब्रस्तानात नेताच आरोपी फिरोज खानने दिव्यांग विकासच्या गळ्यावर, पोटात धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात विकासचा जागीच मृत्यू झाला. नुकतंच उजाडत असताना हा प्रकार घडला. आरोपी फिरोजने यानंतर विकासच्या जवळ असलेले पाचशे रुपये आणि काही वस्तू घेऊन पोबारा गेला.

    कब्रस्तानात सकाळी साडेसात वाजता या हत्येची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली. हाती लागलेल्या फुटेजमध्ये आरोपी फिरोज विकासला दुचाकीवर बसवून नेताना स्पष्ट दिसून आले आहे. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक करून खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला.

    विकासला व्हायचे होते बँक अधिकारी

    अवघ्या 23 वर्षांचा विकास चव्हाण हा नगरमधील पाथर्डी येथील हरीचा तांडा येथील रहिवासी होता. विकास बालपणापासून एका पायाने अधू होता. विकासच्या घरची परिस्थितीही अत्यंत नाजूक होती. विकास आई आजारी असून पलंगावर पडून आहे. विकासला सरकारी अधिकारी होण्याची इच्छा होती, त्यासाठी तो खूप मेहनतही घेत होता. ज्या बँकेच्या परीक्षेसाठी त्याने रात्रंदिवस तयारी केली होती, ती देण्याआधीच त्याची हत्या झाली.

    विकासचा मृतदेह न्यायालाही कुटुंबाकडे नव्हते पैसे

    विकासचा भाऊ ऊसतोड मजूर आहे. आपल्या भावाच्या खुनाची माहिती समजताच त्याला मोठा धक्का बसला. गावातील काही जणांना सोबत घेऊन विकासचा भाऊ औरंगाबाद ला आला. पण त्याची परिस्थिती एवढी वाईट होती की, आपल्या भावाचे पार्थिव गावाकडे नेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशावेळी पोलिसांतली माणुसकी जागी झाली. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी अॅम्ब्युलन्सचा खर्च करून मृतदेह पाठवण्याची व्यवस्था केली.

    Divyang Youth who came for a bank exam Brutally Killed in Aurangabad News

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस