• Download App
    मला विचारून लफडं केलं का? तक्रार घेऊन आलेल्या महिलेला खासदार नवनीत राणा यांनी केला उलट सवाल|Did you affair after asking me for asking? MP Navneet Rana asked the woman who brought the complaint

    मला विचारून लफडं केलं का? तक्रार घेऊन आलेल्या महिलेला खासदार नवनीत राणा यांनी केला उलट सवाल

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : तुम्ही दुसरा लफडा केला ते मला विचारून केलं का? असा असभ्य सवालच खासदार नवनीत राणा यांनी या महिलेला विचारला आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी राणा यांनी या महिलेवर आरोप केले.Did you affair after asking me for asking? MP Navneet Rana asked the woman who brought the complaint

    नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्षाच्या उपेन बच्छेले नामक अचलपूर येथील पदाधिकारी आहे. बच्छेले याने आपली फसवणूक केल्याची तक्रार एका पीडित महिलेनं फोन द्वारे नवनीत राणा यांच्याकडे होती. या पदाधिकाºयाचे पहिले लग्न झालेले असताना देखील त्याने पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरे लग्न केले.



    त्यानंतर पहिली पत्नी आणि 18 महिन्याच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप या महिलेनं केला होता. या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दाद मागण्यासाठी नवनीत राणा यांना फोन केला होता.

    पण ‘तुम्ही दुसरा लफडा केला तो काय मला विचारून केला का?’ असा उलट सवाल विचारून नवनीत राणा यांनी पीडित महिलेला अपमानीत केले. नवनीत राणा यांच्या या उत्तरामुळे पीडित महिला दुखावली गेली. त्यानंतर या पीडित महिलेने महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे.आपण या महिलेचं मन दुखावलं नसून यात माझा काय सहभाग अशा सौम्य भाषेत मी तिला प्रतिउत्तर दिले आहे, असं राणा यांनी सांगितलं आहे.

    Did you affair after asking me for asking? MP Navneet Rana asked the woman who brought the complaint

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक