• Download App
    Dhananjay Munde: Who was / was she? Shocking conspiracy in Karuna Munde case; An unidentified woman with a pistol in her car? VIDEO VIRAL

    Dhananjay Munde : वो कौन थी/था ? करुणा मुंडे प्रकरणात धक्कादायक षडयंत्र ; गाडीत पिस्तूल ठेवणारी अज्ञात महिला ? VIDEO व्हायरल

    एवढंच नाहीतर तोंड बांधून असलेल्या या व्यक्तिसह आणखी तीन तरुणी व्हायरल व्हिडीओत आढळून आल्या आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    बीड : करुणा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे म पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यातला वाद परळीमध्ये शिगेला पोहोचला. करुणा या परळीमध्ये दाखल झाल्या पण त्यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. पण, आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ति गाडीची डिकी उघडून काही तरी ठेवत असल्याचे दिसून आले.पेहराव महिलेचा असला तरीही ती व्यक्ती पुरूष असल्याचे व्हिडीओ वरून स्पष्ट दिसत असल्याने हे षडयंत्र असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. Dhananjay Munde: Who was / was she? Shocking conspiracy in Karuna Munde case; An unidentified woman with a pistol in her car? VIDEO VIRAL



    करुणा मुंडे यांच्या गाडीत आढळलेल्या रिव्हाल्वर नंतर आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. करुणा शर्मा  गाडीतून वैद्यनाथ मंदिरासमोरून परत जात  होत्या. त्यावेळी गाडीजवळ एक व्यक्ति आली. अनोळख्या व्यक्तीनं तोंडाला पूर्णपणे झाकलेलं असतं. प्रथम दर्शनी महिला वाटणार्या व्यक्तिने गाडीची डिकी उघडून त्यात काहीतरी वस्तू ठेवली असल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे. एवढंच नाहीतर तोंड बांधून असलेल्या या तरुणीसोबत आणखी तीन तरुणी तिथे आढळून आल्या आहे.

    विशेष म्हणजे, यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते, सर्वजण करुणा शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देत आहे. तिथे एक पोलीस अधिकारी सुद्धा उभा होता. एवढ्या गर्दीत या व्यक्तिने गाडीत काय ठेवलं? आणि ठेवणारी व्यक्ति कोण? असे प्रश्न आता निर्माण झाले आहे.

    Dhananjay Munde: Who was / was she? Shocking conspiracy in Karuna Munde case; An unidentified woman with a pistol in her car? VIDEO VIRAL

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!