- जगमित्र कारखाना जमीन खरेदी प्रकरण
- रेमडिसिव्हीरमागे उद्धव ठाकरे यांना 1 हजार रुपये मिळायचे. अजित दादांनी जरंडेश्वर लुटला आणि धनजंय मुंडे यांनी जगमित्र कारखाना लुटला.
- सोमय्यांची पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती
विशेष प्रतिनिधी
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन खरेदी प्रकरणी झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या गुरुवारी बीड जिल्हा दौर्यावर होते. ‘शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी गल्ली ते दिल्ली जाईन. मी पोलीस महासंचालकांना भेटणार आहे,’ असं सोमय्या आरोप करताना म्हणाले.DHANANJAY MUNDE: Next number of Dhananjay Munde! 83 crores looted from farmers; Kirit Somaiya’s press conference live in Ambajogai!
किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी अंबाजोगाईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, ‘बर्दापूर पोलीस निष्पक्ष चौकशी करतील यात शंका आहे. दहा वर्षे झाले 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून भाग भांडवल म्हणून गोळा करण्यात आले. हे पैसे गेले कुठे? या पैशाचा वापर कुठे करण्यात आला? या सर्वांची उत्तरे मिळाली पाहिजेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
- WATCH : जगमित्रसाठी गोळा केलेले ८३ कोटी रुपये गेले कोठे ? किरीट सोमय्या यांचा धनंजय मुंडे यांना सवाल
‘कारखाण्यासाठीची जागा फसवणुकीने घेतली गेली. मृत व्यक्तीचा अंगठा मारून जमीन बळकावली,’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘धनंजय मुंडेंच्या माणसांनी मला गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. मला धमकीचे दोन मेसेज आले. मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना याबद्दल कळवलं आहे’, अशी माहितीही सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.
DHANANJAY MUNDE: Next number of Dhananjay Munde! 83 crores looted from farmers; Kirit Somaiya’s press conference live in Ambajogai!
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा
- शिवसेना आमदारांची तक्रार खरीच; आमदार निधी वाटपात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी चौपट!!; काँग्रेसचीही सेनेवर आघाडी
- बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!
- पिंपरी : मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड ; राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना घडला प्रकार