• Download App
    देवेंद्र फडणवीसांनी बनावट नोटा प्रकरण दाबले; आरोपीच्या भावाला मौलाना आझाद मंडळाचे अध्यक्ष केले, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप । Devendra Fadnavis suppresses counterfeit notes case; The accused's brother was made the chairman of Maulana Azad Mandal, a serious allegation made by Nawab Malik

    देवेंद्र फडणवीसांनी बनावट नोटा प्रकरण दाबले; आरोपीच्या भावाला मौलाना आझाद मंडळाचे अध्यक्ष केले, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका पाठोपाठ एक आरोपांची फटाक्यांची माळ लावत राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांनी बनावट नोटा प्रकरण दाबल्याचा दावा केला आहे. Devendra Fadnavis suppresses counterfeit notes case; The accused’s brother was made the chairman of Maulana Azad Mandal, a serious allegation made by Nawab Malik

    बनावट नोटांच्या प्रकरण दाबण्यात देवेंद्र फडणवीस हे पुढे होते. इतकेच नाही तर मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मोठ-मोठ्या पदावर बसवले, असाही आरोप नवाब मलिक यांनी लावला.

    नवाब मलिकांनी म्हणाले, की मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत आहे. जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितले की दहशतवाद, काळापैसा संपवण्यासाठी नोटबंदी लागू करत आहे. नोटबंदीनंतर देशाच्या विविध भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 म्हणजेच जवळपास 1 वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचे प्रकरण समोर आले नाही. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. फक्त ८ लाख ८० हजाराच्या बनावट नोटा सापडल्याचे दाखवून मामला रफादफा करण्यात आला.



    बनावट नोटांचे कनेक्शन हे आयएसआय, पाकिस्तान, दाऊद व्हाया बांगलादेशमार्फत देशभरात पसरवले जात आहे. 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात 8 लाख 80 हजार दाखवले गेले. मुंबईत एक पुण्यात एकाला अटक केली. यामध्ये इमरान आलम शेख, रियाज शेख आणि नवी मुंबईतून एकाला अटक केली. मात्र, 14 कोटी 56 लाख पकडले गेले आणि 8 लाख 80 हजार सांगत प्रकरण दाबले.

    पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात चालवल्या जातात… या प्रकरणात गुन्हा दाखल होतो आणि त्यातील आरोपींना काही दिवसांत जामीन मिळतो. हे प्रकरण एनआयएला दिलं जात नाही. प्रकरणाचा तपास होत नाही. याचे कारण म्हणजे जे लोक हे रॅकेट चालवत होते त्यांना तात्कालीन सरकारचे संरक्षण मिळाले. पकडलेला काँग्रेसचा नेता आहे, असे सांगितले. हा काँग्रेसच्या काँग्रेस नेत्यांवर बिल फाडण्याचा प्रकार होता.

    या प्रकरणातील आरोपी इमरान शेख हा हाजी अराफत याचा भाऊ आहे. तत्कालीन सरकारचा वरदहस्त असल्याने प्रकरण दाबले. उलट
    फडणवीसांनी हाजी अराफत याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्षपद दिलं मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी गुंड्डांना मोठ्या पदावर बसवले. हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीस यांनी बांधकाम कामगार मंडळाचं अध्यक्ष बनवले, असे आरोपही नवाब मलिक यांनी केले आहेत.

    Devendra Fadnavis suppresses counterfeit notes case; The accused’s brother was made the chairman of Maulana Azad Mandal, a serious allegation made by Nawab Malik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस