आम्ही ५० टक्यांच्या वरील आरक्षण न्यायालयात वाचवून दाखवले . त्यासाठी राम शिंदे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या मंत्र्यांनी अतिशय उत्तम काम केलं. पण महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा करत आरक्षणाचा मुडदा पाडला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देईन आणि आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असेही त्यांनी सांगितले. Devendra Fadnavis attacks Mahavikas Aghadi for wasting time on OBC reservation
विशेष प्रतिनिधी
नागपूर: आम्ही ५० टक्यांच्या वरील आरक्षण न्यायालयात वाचवून दाखवलं. त्यासाठी राम शिंदे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या मंत्र्यांनी अतिशय उत्तम काम केलं. पण महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा करत आरक्षणाचा मुडदा पाडला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देईन आणि आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राज्याभरात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नागपुरात सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणाचे मारेकरी काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यांची काँग्रेस कार्यालयात उठबस असते. त्यांनी या आरक्षणाबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली होती.आम्ही ओबीसी आरक्षणासाठी रात्री अध्यादेश काढला. मग तो लगेच राज्यपालांकडे पाठवला. पण महाविकास आघाडी सरकारनं १५ महिने न्यायालयात शपथपत्रच सादर केले नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातलं ओबीसींचं राजकीय आरक्षण गेले.
मालेगावमध्ये भाजपचे ओबीसी आरक्षणाच्या बाजूने जोरदार आंदोलन
महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेत्यांची कुचंबणा होत आहे. मात्र राजकीय भवितव्याची चिंता असल्याने त्यांना याविरोधात बोलताही येत नाही. सरकारमधील मंत्र्यांनी मोर्चे काढण्याऐवजी न्यायालयात बाजू नीट मांडली असती तर आरक्षण गेले नसते. आज संपूर्ण देशात ओबीसींचे आरक्षण कायम आहे. काँग्रेसशासित छत्तीसगड, राजस्थानातही आरक्षण कायम असताना महाराष्ट्रात मात्र ओबीसींना आरक्षण नाही. याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
Devendra Fadnavis attacks Mahavikas Aghadi for wasting time on OBC reservation
महत्त्वाच्या बातम्या