विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये २७ व्या स्थानावर आली आहे. ती एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल 3 कोटी रुपये मानधन घेते. विराट कोहली एका पोस्टसाठी पाच कोटी रुपये घेतो.Desi girl Priyanka Chopra in Instagram’s Richlist, takes Rs 3 crore for a post while Virat Kohli takes Rs 5 crore
या लिस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली 19व्या क्रमांकावर आहे. टॉपर इन्स्टाग्राम रिच लिस्ट दरवर्षी जाहीर केली जाते. या लिस्टमध्ये त्या सेलिब्रिटींची नावं येतात जे एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी सर्वात जास्त मानधन घेतात.टॉपर इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये १०० सेलिब्रिटींचा सहभाग असतो.
प्रियंका चोप्रा इन्स्टाग्रामवर खूप सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 65 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. मागच्या वर्षीच्या इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये प्रियंका चोप्रा 19 व्या क्रमांकावर होती. त्यावेळी प्रियंका चोप्रा एका पोस्टसाठी 2 कोटी 71 हजार रुपये मानधन घेत होती. परंतू यावर्षीच्या लिस्टमध्ये प्रियंका चोप्रा 27 व्या क्रमांकावर असली तरी सुद्धा तिच्या मानधनात काहीच घट झाली नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. जगभरात कोहलीचे चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडिया अकाउंट्सवर त्याच्या चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. हॉपर एचक्यूने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली.
या यादीत स्थान मिळालेला कोहली हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. या यादीनुसार ३२ वर्षीय विराट इन्स्टाग्रामवर प्रायोजित पोस्टद्वारे ५ कोटींची कमाई करतो. रिचलिस्टच्या टॉप-२० मध्येही कोहलीला स्थान मिळाले आहे.
हॉपर एचक्यूच्या यादीनुसार, इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. जुव्हेंटस फुटबॉल क्लबकडून खेळणाºया रोनाल्डोला इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी ११.९ कोटी रुपये मिळतात. या यादीमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई आणि हॉलीवूडचा सुपरस्टार ड्वेन जॉन्सन आणि पॉप गायक एरियाना ग्रान्डे अनुक्रमे दुसºया आणि तिसºया क्रमांकावर आहेत.
Desi girl Priyanka Chopra in Instagram’s Richlist, takes Rs 3 crore for a post while Virat Kohli takes Rs 5 crore
महत्त्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स, मुलगा ऋषीकेशलाही हजर राहण्यास सांगितले
- ओवेसींचे आव्हान योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारले, म्हणाले त्यांना विशेष समाजाचे समर्थन असले तरी आम्ही मुल्यांवर निवडणुका लढवू
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूतल्या ४ आमदारांना चर्चेला वेळ दिला यातला राजकीय संदेश काय…??
- राफेलच्या व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी; राहुल गांधींनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले, चोर की दाढी…