• Download App
    ‘’मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, याने इतिहास बदलत नाही’’ फडणवीसांचा शरद पवारांना टोला! Deputy Chief Minister Devendra Fadnaviss response to Sharad Pawar's criticism

    ‘’मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, याने इतिहास बदलत नाही’’ फडणवीसांचा शरद पवारांना टोला!

    ‘’…ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जे केले ती बेईमानी कशी?’’ असा सवालही उपस्थित केला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  ‘’मी प्राथमिक शाळेत असेन किंवा माझा जन्म झाला नसेन. यामुळे घडलेला इतिहास कधीच बदलत नसतो. त्यामुळे इतिहास हाच आहे की, शरद पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी सरकार बनविले होते. माझा प्रश्न हाच आहे की, ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जे केले ती बेईमानी कशी?’’, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा उपस्थित केला. Deputy Chief Minister Devendra Fadnaviss response to Sharad Pawars criticism

    चंद्रपूर येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा उल्लेख केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी आज देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी प्राथमिक शिक्षण घेत असतील, त्यामुळे त्यांना इतिहास ठावूक नसेल, असे म्हटले होते. त्याबाबत माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’शरद पवार म्हणाले ते खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शिक्षणच घेत होतो. पण, मी काल जे बोललो, जे एकतर शरद पवारांनी पूर्णपणे ऐकले नाही किंवा ते शरद पवारांना अस्वस्थ करणारे होते. 1978 मध्ये ते वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. तेव्हा ते 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी आमच्यासोबत सरकार सरकार स्थापन केले. कालही मी हेच सांगितले होते. ते आमच्यासोबत म्हणजे जनसंघासोबत आले, हे तर मी कालच भाषणात सांगितले. पण, माझा मूळ प्रश्न हा आहे की, पवारांनी केले ती मुत्सदेगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केली ती बेईमानी कशी?’’

    याचबरोबर, ‘’उलट एकनाथ शिंदे यांनी जे केले ती मेरिटची केस आहे. ते निवडणुकीत आमच्यासोबत निवडून आले होते आणि आमच्याच सोबत आले. याउलट शरद पवार काँग्रेससोबत निवडून आले आणि आले आमच्यासोबत. मी प्राथमिक शाळेत असो की जन्माला आलो नाही, याने इतिहास बदलत नसतो. इतिहास हाच आहे की, पवार यांनी 40 आमदार घेऊन सरकार पाडले आणि त्यांनी सरकार बनविले, तेवढेच मी सांगितले.’’  असंही फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवलं.

    Deputy Chief Minister Devendra Fadnavis response to Sharad Pawars criticism

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस