विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असतानाच राज्यात डेंगी आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या नऊ महिन्यात डेंगीचे ५,९४४ रुग्ण आढळले असून तब्बल ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.Dengue increasing very fastly in Maharashtra
राज्यात गेल्या वर्षी डेंगीचे एकूण ३,३५६ रुग्ण आढळले होते; मात्र या वर्षीच्या आकडेवारीवरून राज्यातील साथरोग परिस्थिती चिघळत असल्याचे दिसत आहे. डेंगीमुळे नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक सहा मृत्यू झाले आहेत; तर वर्धा, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, अहमदनगर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला.
गेल्या वर्षी डेंगीमुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. डेंगीसोबतच चिकनगुनियाचा आजारही फैलावत आहे. सध्या राज्यात चिकनगुनियाचे १,४४२ रुग्ण आहेत. गेल्या वर्षी फक्त ७८२ रुग्णांची नोंद झाली होती.
कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळसारखे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही राज्यात वाढले आहे. या आजारांचे आतापर्यंत १,२१७ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी १,१७४ रुग्णांना बाधा झाली होती. २०१८ मध्ये २२८९; तर २०१९ मध्ये १,५१० रुग्णांची नोंद झाली होती.
Dengue increasing very fastly in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच
- C-२९५ लष्करी वाहतूक विमानाचा करार लवकरच होईल फायनल
- PM MODI US VISIT : अमेरिका दौऱ्यात ‘डिजिटल इंडिया’चा नारा;पंतप्रधान मोदींनी घेतली Qualcomm च्या सीईओंची भेट; नवीन व्यापारी संधी शोधणार-बैठकीत एकमत
- AURANGABAD RAPE CAAE : बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांना दणका-तपास राजकीय दबावाखाली-बी समरी रिपोर्ट रद्द; पुन्हा तपासाचे न्यायालयाचे आदेश