वृत्तसंस्था
पुणे : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांचा गौरव करण्यासाठी त्याच्या नावाने पुण्यातील कॅन्टोन्मेंट भागात आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट येथे नीरज चोप्रा स्टेडियम उभारण्यात आले आहे. त्याचे उदघाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नीरज चोप्रा आणि संरक्षण दलातील मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.Defence Minister Rajnath Singh inaugurated a stadium named after Tokyo Olympics gold medalist Neeraj Chopra at Army Sports Institute in Pune. Army Chief General MM Naravane and Neeraj Chopra were also present at the occasion.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत नीरज चोप्रा यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या नेत्रदीपक आणि देशाला अभिमान वाटणाऱ्या कार्याची दाखल भारतीय लष्कराने आणि संरक्षण मंत्रालयाने घेतली. त्यानंतर त्यांच्या नावाने पुण्यात स्टेडियम उभारून त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे झालेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी स्टेडियमचे उदघाटन रिमोट कंट्रोलची कळ दाबून केली. तेव्हा ‘नीरज चोप्रा स्टेडियम, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे कॅन्टोन्मेंट’ यावरील कापडी पडदा हळूहळू बाजूला होताच परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला. अर्थात हा कार्यक्रम कोरोनामुळे मोजक्या लोकांचा उपस्थितीत पार पडला.
एएसआय पुणेचे घवघवीत यश एएसआय, पुणेने आतापर्यंत ३४ ऑलिंपियन, २२ राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेते, २२ आशियाई क्रीडा पदक विजेते, सहा युवा क्रीडा पदक विजेते आणि १३ अर्जुन पुरस्कार विजेते तयार केले आहेत.
Defence Minister Rajnath Singh inaugurated a stadium named after Tokyo Olympics gold medalist Neeraj Chopra at Army Sports Institute in Pune. Army Chief General MM Naravane and Neeraj Chopra were also present at the occasion.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वरुण सरदेसाई पुन्हा आला, तर परत जाणार नाही, आम्ही सोडणार नाही’; नारायण राणेंचा थेट इशारा
- ‘महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे, शिवसेना कोकणविरोधी’ असल्याची आशिष शेलार यांची टीका
- ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, अन्यथा ओबीसींची अपरिमित हानी, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा
- तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून भारत बनेल महासत्ता ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पुण्यात दृढविश्वास