• Download App
    नितेश राणे यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर दुपारी निर्णय; नारायण राणे नागपूर दौरा सोडून कणकवलीत Decision on Nitesh Rane's pre-arrest land application in the afternoon

    नितेश राणे यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर दुपारी निर्णय; नारायण राणे नागपूर दौरा सोडून कणकवलीत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर होत आहे. या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची तलवार लटकत आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दुपारी निर्णय होणार आहे. Decision on Nitesh Rane’s pre-arrest land application in the afternoon

    या प्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी केली आहे.



    नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. तर अॅड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत ही कायदेतज्ञ सहकार्य करणार आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत आणि अॅड भूषण साळवी हे राज्य सरकारतर्फे ते युक्तिवाद करतील. आज दुपारी २.४५ वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होईल. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परतल्यानं चर्चांना आणखी उधाण आले आहे.

    Decision on Nitesh Rane’s pre-arrest land application in the afternoon

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस