• Download App
    शरद पवार, राऊतांना जीवे मारण्याच्या धमक्या; फडणवीसांचे कठोर कायदेशीर कारवाईचे आदेश Death threats to Sharad Pawar, Raut; Fadnavis orders strict legal action

    शरद पवार, राऊतांना जीवे मारण्याच्या धमक्या; फडणवीसांचे कठोर कायदेशीर कारवाईचे आदेश

    • शरद पवार, संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या; सुप्रिया सुळेंची तक्रार; पोलीस आयुक्तांकडून दखल

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. Death threats to Sharad Pawar, Raut; Fadnavis orders strict legal action

    महाराष्ट्र हे सभ्य आणि सुसंस्कृत राज्य आहे. इथे राजकीय मतभेद असतील. पण अशा धमक्या देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. कोणाचेही संयम ओलांडणे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी संबंधितांना इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्तांबरोबर बैठक घेत त्यांनी या धमक्यांसंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

    शरद पवार यांना तुझा लवकरच दाभोळकर करू, अशी धमकी आली आहे. अशी धमकी आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी देत थेट मुंबईच्या पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्रालय फेल झाले असून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट महाराष्ट्रात लक्ष घालावे, अशी मागणी केली.

    पण त्या पाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली. रोजचा सकाळचा 9.00 वाजताचा भोंगा बंद करा अन्यथा गोळ्या घालू, असे सुनील राऊत यांच्या मोबाईलवर ऑडिओ रेकॉर्ड पाठविल्याची बातमी आहे.

    या धमक्यांनंतर फडणवीस ॲक्शन मोड मध्ये आले त्यांनी पोलीस आयुक्तांची बैठक घेऊन त्यांना संबंधितांवर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले.

    – धमकीचे प्रकरण असे :

    राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून दिली आहे, तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.

    सौरभ पिंपळकर या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंटवर ही व्यक्ती अमरावतीची असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपचा कार्यकर्ता असल्याचंही त्याच्या अकाऊंटवर नोंदवलेलं आहे. मात्र, हे अकाऊंट ओरिजिनल आहे की फेक आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

    धमकी देणे दुर्देवी

    शरद पवार यांना आलेल्या धमकीप्रकरणी सुप्रिया सुळेंकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने दखल घ्यावी. शरद पवारांना धमकी येणं दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरुर असतात. मात्र, इतक्या खालच्या स्तरावर जाऊ नये, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

    कोणीही असेल तरी कारवाई : बावनकुळे

    दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर दिली आहे.

    Death threats to Sharad Pawar, Raut; Fadnavis orders strict legal action

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस