विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतली लढाई संजय राऊत यांचे एक ट्विट आणि दादा भुसे यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी झाली चित असे आज विधानसभेत घडले आहे शिवसेनेतल्या दोन गटांमध्ये सध्या तुंबळ शब्द युद्ध सुरू आहे रोज दोन्ही बाजूंनी एकमेकांवर प्रचंड आगपाखड होते आहे. पण या लढाईत संजय राऊत यांनी एक ट्विट केले आणि त्यांना दादा भुसे यांनी विधानसभेत प्रत्युत्तर दिले त्यामुळे या लढाईत राष्ट्रवादी चीत झाली आहे.Dada bhuse targets Sanjay Raut but NCP leaders irrupted in maharashtra legislative assembly
दादा भुसे यांच्यावर संजय राऊत यांनी एक ट्विट केले ते असे :
हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल.
हे ट्विट मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत वाचून दाखवली आणि संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. संजय राऊत भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी करतात राष्ट्रवादीची माननीय शरद पवारांची!!, अशा शब्दात दादा भुसे यांनी संजय राऊत यांचे वाभाडे काढले. मात्र, शरद पवारांचे नाव घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चिडले आणि विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी विधानसभेच्या कामकाजातून दादा भुसे यांच्या वक्तव्यातले शरद पवारांचे नाव काढून टाकण्याचे मागणी केली. दादा भुसे यांचे वक्तव्य तपासून त्यातला आक्षेपार भाग काढून टाकू, असे आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
मात्र दादा भुसे यांचे हे वक्तव्य तोपर्यंत प्रचंड व्हायरल झाले. सगळीकडे दादांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीच्या संतप्त आमदारांनी विधानसभेच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. त्यावर दुसरे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट खुलासा केला. शरद पवारांविषयी आदर आहे. परंतु जे महागद्दार आमच्या मतांवर निवडून येऊन आम्हाला वाट्टेल तसे बोलतात, त्यांच्यावर दादा भुसे यांनी वक्तव्य केले आहे. अध्यक्षांनी ते वक्तव्य तपासून त्यातला अवमान फरक उल्लेख काढून टाकणार असे म्हटले आहे, पण आम्हाला वाटेल ते बोलतात ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
त्यावर जयंत पाटलांनी आधीच दादा भुसे यांचे वक्तव्य व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता ते विधानसभेच्या कामकाजातून काढून टाकूनही काही उपयोग नाही, असे अध्यक्षांना उद्देशून वक्तव्य केले.
या सर्व प्रकारात दादा भुसेंनी मात्र संजय राऊत यांच्या ट्विट वरून विधानसभेत दिलेले उत्तर सगळीकडे गाजले आणि त्यावरच महाराष्ट्रात सगळीकडे संजय राऊत हे नेमके कोणत्या शिवसेनेचे आहेत आणि ते राष्ट्रवादी राष्ट्रवादी विषयी सहानुभूती बाळगून पवारांचे नेतृत्व मानतात, याची चर्चा सुरू झाली आहे.
Dada bhuse targets Sanjay Raut but NCP leaders irrupted in maharashtra legislative assembly
महत्वाच्या बातम्या
- सीबीआयप्रकरणी सिसोदिया यांच्या जामिनावर आज सुनावणी : काल कोर्टाने मद्य धोरण प्रकरणात दिली 14 दिवसांची कोठडी
- ‘’विरोधी एकजूट म्हणजे दिखाऊपणा असून केवळ….’’ एकजुटीसाठी धडपडणाऱ्या विरोधकांना प्रशांत किशोर यांनी सुनावलं!
- राहुल गांधी लोकसभेत देणार लंडनच्या भाषणावर खुलासा, संसदेत बोलण्याची परवानगी मागितली, अध्यक्षांना पत्र
- फ्रान्समध्ये निवृत्तीचे वय वाढविण्याचा कायदा लागू : मॅक्रॉन सरकारने दोन्ही अविश्वास मते जिंकली; लोकांचा विरोध सुरूच