Cyclone Taukte Live Updates : चक्रीवादळ तौकतेचा किनारपट्टीवर कहर सुरू आहे. यादरम्यान मुंबईहून 175 किमी अंतरावरील बॉम्बे हायच्या हीरा ऑइल फील्ड्सजवळ एक नावेवर कमीत कमी 273 जण अडकल्याची माहिती समोर आल्याने चिंता वाढली आहे. त्यांच्या बचावासाठी नौसेनेने मदत रवाना केली असली तरी एका माहितीनुसार त्यातील 15 जण बेपत्ता झाले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. एक अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत माहिती दिली. Cyclone Taukte Live Updates Indian Navy sends ships to rescue 273 people stranded on ONGC Barge near Bombay High
वृत्तसंस्था
मुंबई : चक्रीवादळ तौकतेचा किनारपट्टीवर कहर सुरू आहे. यादरम्यान मुंबईहून 175 किमी अंतरावरील बॉम्बे हायच्या हीरा ऑइल फील्ड्सजवळ एक नावेवर कमीत कमी 273 जण अडकल्याची माहिती समोर आल्याने चिंता वाढली आहे. त्यांच्या बचावासाठी नौसेनेने मदत रवाना केली असली तरी एका माहितीनुसार त्यातील 15 जण बेपत्ता झाले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. एक अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत माहिती दिली.
वृत्तसंस्था आयएएनसने दिलेल्या माहितीनुसार, बार्ज P305 ही चालकदल आणि प्रवाशांसह तेल क्षेत्राजवळ आहे. येथून एक SOS पाठवण्यात आला होता. भारतीय नौसेनेने मदतीसाठी दोन जहाजे आयएनएस कोच्ची आणि आयएनएस तलवारला पाठवले आहे. ही जहाजे दुपारपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. इतर जहाजे व विमानांनाही तेथे पाठवण्याची तयारी सुरू आहे, परंतु चक्रीवादळामुळे अडथळे येत आहेत. हा संपूर्ण परिसर चक्रीवादळाने घेरलेला आहे.
चक्रीवादळ तौकतेच्या मार्गातच ऑइल अँड नॅचुरल गॅस कॉर्पोरेशनच्या बॉम्बे हाय फील्ड्सचा महत्त्वाचा भाग येतो. हे चक्रीवादळ आता दक्षिण गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या वादळाने यापूर्वी केरळ, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रात विध्वंस केला आहे.
Cyclone Taukte Live Updates Indian Navy sends ships to rescue 273 people stranded on ONGC Barge near Bombay High
महत्त्वाच्या बातम्या
- मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने जिंकला Miss Universe 2021चा किताब, मिस इंडिया एडलिना कॅसलिनो टॉप फाइव्हमध्ये
- मध्य प्रदेशात लॉकडाऊनचे नियम मोडल्यास ‘राम नाम’ लिहिण्याची अनोखी शिक्षा
- औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोरोनावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव, डॉक्टरांच्या मदतीसाठी तयार होईल मनुष्यबळ
- DRDOने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2DG लॉन्च; रिकव्हरी होणार फास्ट, ऑक्सिजनची गरजही कमी
- Narada Sting Case : ममतांचे मंत्री फिरहाद हकीम, सुब्रतो मुखर्जींना सीबीआयने घेतले ताब्यात, नारदा घोटाळ्याप्रकरणी चौकशी