वृत्तसंस्था
पुणे : अरबी समुद्रातल्या चक्रीवादळाचा परिणाम पुणे शहर आणि जिल्ह्य़ातही जाणवला. वादळी वारा तसेच पावसामुळे शहरात ४० ठिकाणी झाडे कोसळली. त्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले. Cyclone Effect : Heavy Rain With Wind cause Tree fall in Various parts of pune city
चक्रीवादळामुळे शनिवारी (ता. १५ ) सायंकाळपासून शहरात वारे वाहत आहेत. पाऊस सुरु झाला. रविवारीही सकाळपासून शहरात ढगाळ स्थिती होती. काही भागात दुपारी, सायंकाळी पावसाच्या हलक्या, जोरदार सरी कोसळल्या.
दुपारपासून वारे वाहण्यास सुरुवात झाली. रात्री वाऱ्यांचा वेग वाढला होता. पाऊस तसेच वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरात निर्बंध लागू असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. झाडाखाली शक्यतो थांबू नये, असे आवाहन अग्निशमन दलानने केले.
या परिसरात झाडे कोसळली
कोंढवा बुद्रुक येथील खडी मशीन चौक, सिंहगड रस्त्यावर सनसिटी, आनंदनगर, कोथरूडमधील गुजरात कॉलनी, मुकुंदनगरमधील रांका हॉस्पिटलजवळ, येरवडय़ातील इंदिरानगर वसाहत, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, हडपसरमधील ससाणेनगर, माळवाडी, उंड्री, कात्रज, धनकवडी, दत्तनगर, प्रभात रस्ता, सेनापती बापट रस्ता, सारसबाग, पुणे स्टेशन परिसरातील लडकतवाडी, सहकारनगरमधील तुळशीबागवाले कॉलनी, कोरेगाव पार्क, सेनादत्त पेठ, शिवदर्शन, कसबा पेठेतील तांबट हौद, नवी पेठ, गंज पेठ या ठिकाणी झाडे कोसळली.
Cyclone Effect : Heavy Rain With Wind cause Tree fall in Various parts of pune city
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये वादाचा कारण असलेलं प्रार्थनास्थळ, जाणून घ्या
- वैद्यकीय उपकरणे बनविणाऱ्या नव्या उद्योगांना उत्तर प्रदेशात २५ टक्के सबसिडी
- योगी आदित्यनाथांनी करून दाखविले, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १६.३३ टक्यांवरून ४.८ टक्के, मुंबई उच्च न्यायालयाने कौतुक करत महाराष्ट्रात यूपी मॉडेल राबविण्याच्या केल्या सूचना