• Download App
    क्रूझ ड्रग्ज पार्टी केस : कोर्टाचा सविस्तर निर्णय आज येणार, आर्यन खानला ' या ' अटींवर मिळाला जामीनCruise drugs party case: Detailed court verdict to come today, Aryan Khan granted bail on 'these' terms

    क्रूझ ड्रग्ज पार्टी केस : कोर्टाचा सविस्तर निर्णय आज येणार, आर्यन खानला ‘ या ‘ अटींवर मिळाला जामीन

    शुक्रवारी सविस्तर निकाल येणार असून, तोपर्यंत त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. Cruise drugs party case: Detailed court verdict to come today, Aryan Khan granted bail on ‘these’ terms


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचा ‘मन्नत’ अखेर २४ दिवसांनंतर गुरुवारी पूर्ण झाला. मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुला आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. शुक्रवारी सविस्तर निकाल येणार असून, तोपर्यंत त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

    सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एन.डब्ल्यू.सांबरे म्हणाले, तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मी उद्या संध्याकाळपर्यंत सविस्तर आदेश जाहीर करेन. आर्यनच्या वकिलांनी जामिनाची रक्कम जमा करण्याची परवानगी मागितली. पण ती नाकारण्यात आली. न्यायमूर्ती म्हणाले, जामीन देणे बाकी आहे. मी कालही ऑर्डर देऊ शकलो असतो, पण आज दिला.आता उद्यापर्यंत थांबा.

    या अटींवर जामीन

    १) आर्यन मुंबई सोडू शकत नाही, शहराबाहेर किंवा परदेशात जाण्यासाठी परवानगी आवश्यक आहे.

    २) दर शुक्रवारी सकाळी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल.

    Cruise drugs party case: Detailed court verdict to come today, Aryan Khan granted bail on ‘these’ terms

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    फडणवीस सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमने

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती